Police Kusti : राहुल आवारे, नरसिंग यादव, विजय चौधरी, पोलीसांनी गाजवलं जागतिक पोलीस कुस्तीचं मैदान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्राच्या राहुल आवारे, नरसिंग यादव आणि विजय चौधरी या तीन पोलीस उप-अधीक्षकांनी जागतिक पोलीस कुस्तीचं मैदान गाजवलंय. कॅनडातल्या विनीपेगमध्ये आयोजित जागतिक पोलीस अँड फायर गेम्समध्ये महाराष्ट्राच्या या तीन पैलवानांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावलं. राहुल आवारे पुण्यात सीआरपीएएफमध्ये आणि नरसिंग यादव मुंबई पोलिसांत, तर विजय चौधरी पुणे पोलिसांच्या अँटी करप्शन विभागात पोलीस उप-अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. नरसिंग यादव आणि राहुल आवारे यांनी याआधी राष्ट्रकुल सुवर्णपदक आणि जागतिक कांस्यपदकाची कमाई केली आहे, तर विजय चौधरीनं सलग तीनदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला आहे.</p>

[ad_2]

Related posts