Pm Narendra Modi Mann Ki Baat Today Campaign To Honour Our Bravehearts Meri Mati Mera Desh; ७५०० कलशांमध्ये गावची माती दिल्लीत येणार, जाणून घ्या ‘मेरी माती-मेरा देश’ मोहिमेबद्दल सर्वकाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनापूर्वी शहिदांच्या सन्मानार्थ देशभरात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात कार्यक्रमात यासंबंधी माहिती दिली आहे. पीएम मोदी म्हणाले की, आज जेव्हा देशात अमृत महोत्सवाचा गजबजा आहे, अशात देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे. देशातील शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी ‘मेरी माती, मेरा देश’ मोहीम सुरू केली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. याअंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

देशभर असेल अमृत कलश यात्रा…

‘मेरी माती मेरा देश’ मोहिमेअंतर्गत देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ ही काढण्यात येणार असल्याचं पीएम मोदींनी सांगितलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती वाहून ही यात्रा देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. या प्रवासात देशाच्या विविध भागातून झाडेही आणली जातील. ७५०० कलशांमध्ये आलेली माती आणि वनस्पती यांचे मिश्रण करून राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ बांधण्यात येणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ देखील ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे भव्य प्रतीक असेल.

अमृता फडणवीसांचं वक्तव्य, देवेंद्र फडणवीस म्हणाले मला खूप सहन करावं लागलं

ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख…

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणार्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेखही लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुढील २५ वर्षे ‘पंच प्राण’बद्दल बोललो होतो. मेरी माती, मेरा देश या मोहिमेत सहभागी होऊन आपण या पाचही यात्रा पूर्ण करण्याची शपथ घेऊ. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या पवित्र मातीची शपथ घेताना तुम्ही सर्वांनी तुमचा सेल्फी yuva.gov.in वर अपलोड करावा.

How to become Rich : करोडपती होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग, दिवसाला फक्त हवे १०० रुपये, क्षणात व्हाल श्रीमंत

[ad_2]

Related posts