Weekly Money Horoscope : 31 जुलै ते 6 ऑगस्ट 2023; ‘या’ लोकांसाठी हा आठवडा असेल खर्चिक, कसा आहे हा आठवडा तुमच्यासाठी?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weekly Money Horoscope 31 July to 6 August 2023 : बघता बघता जुलै महिना संपला. पंचांगानुसार अधिक मास सुरु असून 17 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा करिअर आणि आर्थिकदृष्ट्या कसा असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या आठवड्यात सुरुवातीलाच 1 तारखेला पौर्णिमा असून या दिवशी दुर्मिळ योग जुळून येतो आहे. त्यात संपत्तीचा कारक शुक्र याच आठवड्याच अस्त होणार आहे. अशा स्थिती सर्व 12 राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. काही राशींच्या आयुष्यात आर्थिक संकट वाढणार आहे. चला हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (Weekly Career Horoscope 31 July to 6 August 2023)

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबतच मान सन्मान वाढणार आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडणार आहे. कार्यशैलीवरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून येणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत. या आठवड्यात प्रवास टाळल्यास बरं होईल. 

शुभ दिवस : 31, 4

वृषभ (Taurus)

या राशीसाठीही हा आठवडा शुभदायक असणार आहे. प्रवासातून यश प्राप्त होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. कार्यक्षेत्रात पाटर्नरशीपमध्ये केलेल्या कामात यश मिळणार आहे. हा आठवडा तुम्हाला खर्चिक ठरणार आहे. मात्र लव्ह लाइफमध्ये अडचणी येणार आहेत. 

शुभ दिवस : 2,3

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यशदायी ठरणार आहे. प्रवासातून मोठं यश मिळणार आहे. आवडत्या व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण घालवणार आहात. मात्र कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. भावनेच्या आहारी जाऊ नका, अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्चिक ठरणार आहे. 

शुभ दिवस : 3,4

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीची ठरणार आहे. तुमच्या कामातून यश मिळणार आहे. प्रेमसंबंधासाठीही हा आठवडा उत्तम असेल. प्रवासातून चांगले आणि सकारात्मक संकेत मिळणार आहेत. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर या आठवड्यात खर्च अधिक होणारा आहे. मात्र या आठवड्याच अहंकारावर तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. 

शुभ दिवस : 1,3

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धनलाभाचा ठरणार आहे. त्यांना अचानक कुठून तरी आर्थिक फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील. मात्र कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. हा आठवडा तणावग्रस्त असेल पण आठवड्याच्या शेवटी मनं प्रसन्न राहील. 

शुभ दिवस : 3,6

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच कामाच्या ठिकाणाहून आनंदाची बातमी मिळणार आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबाशी संबंध काही समस्या वाढू शकतात. मुलांकडे लक्ष द्या. या आठवड्यातील प्रवास टाळल्यास योग्य होईल. या आठवड्यात खर्च अधिक होणार आहे. वडिलधाऱ्याकडून मदतीचा हात मिळणार आहे. 

शुभ दिवस : 31, 4

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रवासातून शुभ संकेत मिळतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक बाबत हा आठवडा जास्त खर्चाचा असणार आहे. अनावश्यक वादविवाद टाळा. 

शुभ दिवस : 2,3

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीची असणार आहे. प्रकल्पात प्रगती मिळणार आहे. आर्थिक बाबतीत यशाचे मार्ग मोकळे होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. भविष्याच्या दृष्टीकोनातून तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहात. या आठवड्यातील प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेय पाटर्नरशीपमध्ये केलेलं काम शुभ परिणाम देणार आहेत. 

शुभ दिवस : 3, 4, 5

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीशील असणार आहे. तुमच्या कामातून तुम्हाला यश मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा फलदायी असून तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुम्हाला धनवृद्धीचा शुभ संयोग आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. प्रवासातून शुभ संकेत मिळेल. 

शुभ दिवस: 3, 4, 5

मकर (Capricorn)

या राशीसाठी हा आठवडा चांगला सिद्ध होणार आहे. तुम्हाला हा आठवडा फलदायी आणि यश प्राप्तीचा ठरणार आहे. प्रवासातून यश मिळणार आहे. मनं प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत व्यवहारासाठी हा काळ उत्तम असणार आहे. धनलाभाचेही योग आहेत. 
 

शुभ दिवस: 4,5

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. पाटर्नशीपमधील कामात शुभ संयोग आहे. समजूतदारपणामुळे कामं छान मार्गी लागणार आहे. ऑफिस रोमान्स तुमच्यापैकी काहींसाठी मस्त योगायोग घेऊन आला आहे. प्रवासातून यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा खर्चिक असणार आहे. 

शुभ दिवस : 1, 3, 4 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीशील असणार आहे. प्रकल्पातून नवीन ओढी मिळणार आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. धनलाभामुळे तुमचं बँक बॅलेन्स तगड होणार आहे. प्रवासातून यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीची घेऊन येणार आहे. 

शुभ दिवस: 4, 5

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts