Conjunction of Mars Venus and Mercury after 50 years Trigrahi yoga give wealth these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Mangal And Venus Conjunction In Leo : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी अनेक ग्रह इतर ग्रहांशी युतीही करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. 25 जुलै रोजी बुध ग्रहाने स्वतःच्या राशीत प्रवेश केला आहे. मुख्य म्हणजे यावेळी बुध ग्रहाने मंगळ आणि शुक्र या ग्रहांशी युती केलीये. 

दरम्यान या तीन ग्रहांच्या संयोग सिंह राशीमध्ये होतोय. म्हणूनच या त्रिग्रही संयोगाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर यांचा उत्तम परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा सकारात्मक परिणाम मिळणार आहे. 

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग तयार होणं शुभ सिद्ध ठरणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होणार आहे. यावेळी तुमचं लव्ह लाईफ चांगलं होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकणार आहेत. उत्पन्नही चांगली वाढ होऊ शकते. कार्यक्षेत्रात तुम्ही खूप प्रगती कराल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. 

सिंह रास

शुक्र, मंगळ आणि बुध यांची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीनुसार चढत्या घरात तयार होतोय. यावेळी वैवाहिक जीवनातील समस्या दूर होणार आहेत. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरणार आहे. या योगामुळे तुमच्या राशीवर शनीची पूर्ण दृष्टी असणार आहे. कामाच्या ठिकाणी वरीष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. जोडीदारासोबत कोणता व्यवसाय करत असाल तर यावेळी तुमच्या व्यवसायात भरभराट होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts