Yuvraj Singh Post On Stuart Broad on Retirement From International Cricket; ब्रॉडला क्रिकेटमधील सर्वात मोठी जखम देणाऱ्या युवराजने केली खास पोस्ट; पाहा काय म्हणाला सिक्सर किंग

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अॅशेस मालिकेतील शेवटचा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. ब्रॉडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच चांगली राहिली आहे. २००६ मध्ये पदार्पण केलेल्या ५ गोलंदाजांपैकी ब्रॉडच्या नावावर ६०० हून अधिक बळी आहेत. तथापि, ब्रॉडच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे युवराज सिंगचे सहा षटकार! २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये २१ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात भारतीय फलंदाज युवराज सिंगने एका ६ षटकार मारले होते. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी जखमही आहे.

युवीने ब्रॉडला दिल्या शुभेच्छा

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला शुभेच्छा दिल्या. त्याने खास ट्विट आणि फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. २०११ च्या विश्वचषकात टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या युवराज सिंगने सोशल मीडियावर लिहिले – तुझ्या अविश्वसनीय कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन. रेड बॉलचा सर्वोत्तम आणि धोकादायक गोलंदाजांपैकी एक. आणि एक महान खेळाडू! तुझा प्रवास आणि जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा ब्रॉडी!

युवराज सिंग २०१९ मध्ये निवृत्त झाला तेव्हा स्टुअर्ट ब्रॉडनेही त्याला शुभेच्छा दिल्या. युवीचा फोटो शेअर करताना इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने लिहिले- निवृत्तीचा आनंद घ्या, महान युवराज सिंग.

युवराजला ४ वेळा केले बाद

स्टुअर्ट ब्रॉडनेही युवराज सिंगला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चार वेळा बाद केले आहे. वनडेत ३ वेळा आणि कसोटीत एकदा. युवीने कसोटीत ब्रॉडविरुद्ध ६४ चेंडूत ३९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये ६१ चेंडूत ८२ धावा केल्या. ब्रॉडने टी-२० मध्ये युवराज सिंगला ७ चेंडू टाकले, यावर त्याने ३७ धावा केल्या आहेत.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीनंतर युवराज सिंगच्या सहा षटकारांवरही भाष्य केले. ब्रॉड म्हणाला; “हो, तो साहजिकच खूप कठीण दिवस होता, मी २१ वर्षांचा होतो. मी त्या अनुभवातून बरेच काही शिकलो. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मी फारच कमी राहिलो. मी माझ्या तयारीत घाई केली होती. माझ्याकडे प्री-बॉल रूटीन नव्हते. माझे नीट लक्ष नव्हते,” ब्रॉडने सांगितले की, युवराजविरुद्धच्या अनुभवाने त्याला मानसिकरित्या बळ देण्यास मदत केली आणि बेन स्टोक्सचे उदाहरणही दिले. ज्याने २०१६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अशाच कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले.

[ad_2]

Related posts