Jasprit Bumrah To Lead TeamIndia For Ireland T20Is

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jasprit Bumrah to lead TeamIndia for Ireland T20Is : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालेय. आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने आज आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. सिनिअर खेळाडूंना आराम देत युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंह यालाही संधी देण्यात आली आहे. जितेश शर्मा, तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल या युवा खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहशिवाय प्रसिद्ध कृष्णा यानेही दुखापतीनंतर पुनरागमन केलेय. 

18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.

राहुलचं पुनरागमन नाहीच – 

आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन खेळाडूंचं दुखापतीनंतर पुनरागमन झालेय. पण दोन महत्वाच्या खेळाडूंना अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. त्यामुळे केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. हे दोन्ही खेळाडू आशिया चषकासाठी उपलब्ध असतील की नाही, याबाबत बीसीसीआयकडून सध्या कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

भारतीय संघ कसा आहे ?
 जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान. 

 



[ad_2]

Related posts