२ ऑगस्ट बुधवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बुधवारी म्हणजे 2 ऑगस्ट रोजी मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आहे

तसेच कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

गुरूवारी 3 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी मुंबई, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 

राज्यात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पाहायला मिळाला. पण ऑगस्ट महिना हा अधिकाधिक प्रमाणात कोरडा जाण्याचीच शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागानं पुढील दोन महिन्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या दोन महिन्यांमध्ये देशात मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टी पुढे सरकत असून संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा धो धो कोसळण्याची शक्यता आहे. 

बांगलादेश किनार्‍यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) तयार झाले असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

त्यानंतर पुढील 24 तासांत पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे  (Gangetic West Bengal)ओलांडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून पुढील चार पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


[ad_2]

Related posts