Ravindra Jadeja Says India S Playing Xi Combination For Asia Cup 2023 Is Decided

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup 2023, Team India : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ आशिया चषकात खेळणार आहे. आशिया चषक विश्वचषकाची रंगीत तालीम आहे. यंदा भारतामध्ये विश्वचषक होणार आहे, त्याच्या तयारीसाठी ही चांगली संधी असेल. त्यामुळे वेस्ट इंडिजविरोधातील मालिका मोठी संधी होती. पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात भारतीय संघात बदल करण्यात आले होते.  त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेईंग ११ बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. पण रविंद्र जाडेजा याने टीम इंडियाच्या प्लेईंग ११ बाबत मोठं वक्तव्य केले. 

रविंद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत प्लेईंग ११ बद्दल सांगितले. तो म्हणाला की, आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी प्रयोग करण्यासाठी वेस्ट इंडिजची ही मालिका आमच्यासाठी उत्तम संधी आहे. या मालिकेत आम्ही काही नवीन पर्याय वापरून पाहिले असतील. पण आशिया चषकासाठी प्लेइंग 11 आधीच निश्चित करण्यात आले आहे.

जडेजाने  म्हटले की, वेस्ट इंडिजविरोधातील ही मालिका आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेपूर्वी होत आहे. यामध्ये आम्हाला काही पर्याय वापरण्याची संधी मिळाली आहे. याच्या मदतीने संघाच्या कमकुवतपणाची आणि ताकदीची कल्पना येईल, संघ बांधिणीसाठी आम्हाला सोपे जाईल. कोणत्या कॉम्बिनेशनसोबत खेळायचे हे संघ व्यवस्थापनाला माहीत आहे, यात शंका नाही. आशिया चषकासाठी आम्ही संघ संयोजन आधीच ठरवले आहे.

आशिया चषकात संपूर्ण ताकदीने उतरणार भारतीय संघ –

भारतीय संघ आगामी आशिया चषक स्पर्धेत यजमान पाकिस्तानविरुद्ध 2 ऑगस्ट रोजी पहिला सामना खेळणार आहे. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ या स्पर्धेत पूर्ण क्षमतेने खेळताना दिसतो. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे संघाच्या गोलंदाजीत अधिक ताकद दिसून येईल. त्याचबरोबर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत.

30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. त्यापूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. आशिया चषक भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे भारतीय संघ आशिया चषकात पूर्ण ताकिदीने उतरणार आहे.  जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषकात खेळणार का ? याचं उत्तर लवकरच मिळेल. 

[ad_2]

Related posts