Maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar New Pattern Of Power Display After ED Notice Criticism By Sanjay Shirsat

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Shirsat On Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असून, जयंत पाटील मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तर अडीच ते तीन तासाभरापासून जयंत पाटील यांची तीन अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरुन राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न पाहायला मिळत असल्याचं शिरसाट यांनी म्हटले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत शिरसाट बोलत होते. 

दरम्यान यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, “एखाद्याला ईडीची नोटीस आली तर त्याने शक्तिप्रदर्शन करणे, त्यानुसार आपल्या यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणं चुकीचे आहे. ईडीची नोटीस आली म्हणजे ताबडतोब शिक्षा होते अशातील भाग नाही. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली तर कारवाई करायची की नाही हे ईडी कार्यालय ठरवेल. पण ईडी, सीबीआय यांचा वापर राजकीय लोक करत असल्याचा काही लोकांचा गैरसमज झाला आहे. विशेष म्हणजे जर ईडीचं असा राजकीय वापर करायचाच असता तर अनेकजण आतमध्येच दिसले असते. बाहेर आलेच नसते,” असेही शिरसाट म्हणाले. 

जय शरद पवार आणि जय राहुल गांधी करतायत…

भाजप कितीही राष्ट्रीय पक्ष असला तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच त्यांच्या कार्यालयात किंवा घरी जाऊन युतीची बोलणी केली नाही. कधीही आयुष्यात असे झालं नाही. मात्र हे कटोरा घेऊन दुसऱ्याच्या दारावर जात आहेत आणि बाळासाहेब याचं नाव घेतात. त्यामुळे यांना जोड्याने मारले पाहिजे. बाळासाहेबांनी तुम्हाला हे शिकवले का?, स्वाभिमान हे सर्वात आधी बाळासाहेबांच बोलणं होते. माझा शिवसैनिक स्वाभिमानी असला पाहिजे असे म्हणायचे. उपाशी पोटी असला तरीही शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी म्हणायचा. मात्र आता हे लोकं जय शरद पवार आणि जय राहुल गांधी करत आहेत. आम्हाला शिवसेना शिकवता का?, अशा नालायक लोकांमुळेच उद्धव ठाकरे गटाचे असे हाल असल्याचे शिरसाट म्हणाले. 

संजय राऊत यांना नोटा मोजायला बोलवणार 

ज्यांनी दोन हजारांच्या नोटा दाबून ठेवल्या आहेत, कोट्यवधी रुपयांच्या नोटा मार्केटमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे या नोटा कोणाच्या तरी घरी आहेत. तर आमच्याकडे नोटा आहेत म्हणतात. आता त्या नोटा मोजायला आम्ही संजय राऊत यांना मोजायला बोलवणार आहोत. या मूर्ख माणसाला हे देखील माहित नाही की, त्यांना जे 10 लाख दिले आहेत त्या दोन हजारांच्या नोटा आहे. त्यामुळे त्या नोटा त्यांनी परत कराव्यात असे शिरसाट म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’; जयंत पाटलांच्या समर्थनात संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी रस्त्यावर

[ad_2]

Related posts