( प्रगत भारत । pragatbharat.com)
Budh Grah Vakri : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, सर्व नऊ ग्रह कधी ना कधी त्यांच्या स्थानामध्ये बदल करतात. ग्रहांच्या या हालचालीचा सर्व राशींवर परिणाम होताना दिसतो. काही ग्रह महिन्याला तर काही वर्षभराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या राशी बदलाचा प्रभाव काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो.
बुधाला सर्व ग्रहांचं राजपुत्र मानलं जातं. आगामी काळात बुध वक्री चाल चालणार आहे. बुधाची वक्री चाल सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणार आहे. मात्र यापैकी तीन राशी अशा आहेत, ज्यांना बुध ग्रहाच्या वक्री गतीचा लाभ मिळू शकणार आहे.
24 ऑगस्टपासून बुध ग्रह सिंग राशीत वक्री चाल चालणार आहे. या काळात काही राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ मिळू शकतो. तर काहींची रखडलेली कामं पुन्हा सुरु होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.
कन्या रास
बुध ग्रहाची वक्री चाल कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कन्या राशीचे लोक त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी खूप खर्च करू शकतात. यासोबतच मनात आनंदाची भावना राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक रास
बुध ग्रहाची वक्री गती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल काळ सिद्ध होणार आहे. बुध हा सप्तम घराचा स्वामी आणि कर्म घर आहे. हा तुमचा भाग्यशाली काळ आहे. तुमच्या मनोकामना यावेळी पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. रखडलेली सर्व कामं यावेळी मार्गी लागणार आहेत. नोकरदारांसाठी हा काळ प्रमोशनचा ठरू शकतो. तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळू शकते.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या वक्री चालीचा आर्थिक लाभ होणार आहे. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. अचानक पैसे मिळाल्याने मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबामध्ये एखादं मंगलकार्य घडणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना बाजारात अडकलेला पैसा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )