महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

राज्य सरकारची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही आता अधिक व्यापक करण्यात आली आहे. सर्व लाभार्थी नागरिकांचे आरोग्य कवचही दीड लाख रुपयांऐवजी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेप्रमाणे पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवार, २८ जुलै रोजी सुधारित योजनेचा शासन निर्णय तपशीलवार जाहीर केला.

केंद्र सरकारच्या योजनेसोबत सुधारित स्वरूपात राज्याची जनआरोग्य योजना राबवण्यात येणार असल्याने अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेप्रमाणेच प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच.

एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांतील समाविष्ट उपचारांचा लाभ.

सध्या फुले योजनेत ९९६ तर, प्रधानमंत्री योजनेत एक हजार २०९ उपचार. त्यात वाढ केल्याने आता दोन्ही योजनांत प्रत्येकी एक हजार ३५६ उपचारांचा समावेश.

१,३५६ उपचारांपैकी ११९ उपचार शासकीय रुग्णालयांसाठी राखीव.

एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची एकूण संख्या एक हजार.

मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी फुले जनआरोग्य योजनेतील उपचार खर्च मर्यादा अडीच लाख रुपयांवरून वाढवून साडेचार लाख रुपये.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा फुले जनआरोग्य योजनेत समावेश;होणा

तसेच रस्ते अपघाताबाबतच्या उपचारांची संख्या ७४वरून १८४ करण्यात आली.

उपचाराच्या खर्च मर्यादेतही प्रतिरुग्ण ३० हजार रुपयांवरून एक लाख रुपये, अशी वाढ.


हेही वाचा

मुंबईतल्या ‘या’ भागांमधील बेस्टची बस सेवा विस्कळीत, कंत्राटी चालक बेमुदत संपावर

[ad_2]

Related posts