Team India Create World Record And Leave Pakistan behind After IND vs WI ODI Series ; दिमाखदार विजयासह भारताने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, एकाही संघाला आतापर्यंत ही गोष्ट जमली नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या वनडेत दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकाही जिंकली. भारतीय संघाने त्याचबरोबर एका मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डलाही गवसणी घातली आहे.

भारतासाठी ही विजय सर्वात महत्वाचा मानला जात होता. कारण एक तर या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे मालिका गमावण्याची टांगती तलवार ही भारतीय संघावर होती. पण भारताने या सामन्यात चॅम्पियनसारखा खेळ केला आणि त्यामुळे त्यांना विजय मिळवता आला. भारताने चार अर्धशतकांच्या जोरावर ३५१ धावांची दमदार धावसंख्या उभारली आणि इतिहास रचला गेला. कारण आतापर्यंत भारताने एवढी मोठी धावसंख्या कधीच रचली नव्हती. यापूर्वी भारताने २६ जून २००९ या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळतान ६ बाद ३३९ अशी धावसंख्या उभारली होती. हा सामना किंग्सटन येथे झाले होता. त्यानंतर गेल्या १४ वर्षांत हा विक्रम अबाधित होता. पण या १४ वर्षांनंतर आता भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक धावा करत इतिहास रचला आहे. त्यानंतर भारताेन वेस्ट इंडिजवर तब्बल २०० धावांनी मोछा विजय साकारला. हा भाराचा वेस्ट इंडिजवरील दुसरा विजय ठरला. पण या दोन गोष्टींबरोबरच भारताने एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड यावेळी रचला आहे.

वेस्ट इंडिजने भारताला यापूर्वी वनडे मालिकेत २००६ साली पराभूत केले होते. त्यानंतर भारताने २००७ साली वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत पराभूत केले होते आणि आपल्या पराभवाचा बदला घेतला होता. पण त्यानंतर म्हणजेच २००७ नंतर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका कधीच गमावलेली नाही. भारताचा हा सलग १३ वा वनडे मालिका विजय होता आणि हाच एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणत्याही एका देशाला दुसऱ्या संघाविरुद्ध सलग १३ मालिका विजय साकारता आलेले नाहीत. त्यामुळे आता हा भारताने या वनडे मालिका विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारतीय संघाने या विजयासह जो वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, त्याच्या आसपासही कोणता संघ नाही. यापूर्वी पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध ११ सलग मालिका विजय साकारले होते.

[ad_2]

Related posts