Data Ats Enquiry Says DRDO Dr. Pradeep Kurulkar Delete Mobile Data

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dr. Pradeep Kurulkar : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप असणारे DRDO चे माजी  संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradip Kurulkar) यांच्याबाबत पुन्हा एक नवी माहिती हाती आली आहे. प्रदीप कुरुलकरांनी त्यांच्या मोबाईलमधील सगळा डेटा डिलीट केला आहे. कुरुलकर याच्याकडील असलेला मोबाईलचे “डेटा रिट्रीव्ह” करण्याचे काम सुरू आहे. गुजरात मधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी मोबाईल पाठवला आहे.

प्रदीप कुरुलकर झारा दास गुप्ता हिच्याशी चॅटिंग करत होते. त्यांच्याकडे एकपेक्षा अधिक फोन चौकशी दरम्यान आढळले होते. या फोनमध्ये झारा दास गुप्ता आणि त्यांच्यामध्ये झालेलं संभाषण समोर आलं होतं. त्यामुळे डिलिट केलेल्या डेटामध्ये भारतीय लष्करासंदर्भात तसेच झारा शी केलेल्या चर्चेचे चॅटिंग असण्याची शक्यता आहे. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील यांनी न्यायालयात नमूद केले आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरुलकर याला अटक केली आहे. त्यांच्या आवाजाच्या चाचणीवर (व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस) 9 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

प्रदीप करुलकरने भारताच्या ब्राम्होस क्षेपणास्त्र प्रकल्पाची अतिसंवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्ताला द्यायचं ठरवलं होतं. दोघे प्रत्त्यक्ष भेटल्यानंतर कुरुलकर ही माहिती झाराला देणार होता. आणखी धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलासाठी डीआरडीओने विकसित केलेल्या क्वाडकॉप्टर या उपकरणाच्या चाचणीचे व्हिडीओ कुरुलकरने पाठवले होते. त्याचबरोबर डीआरडीओ मधील देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठरणाऱ्या गोष्टींची माहिती कुरुलकर झारा दासगुप्ताला देत होता. एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात ही माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. 

यासोबतच त्या दोघांमध्ये झालेली चॅटिंगदेखील समोर आली होती. 9ऑक्टोंबर 2022 ते 28  9ऑक्टोंबर 2022या दरम्यान कुरुलकर आणि झारा यांच्यात झालेल्या व्हॉटसप चॅटिंगच्या तपासात ब्राम्होस क्षेपणास्त्र प्रकल्पाची माहिती देणार असल्याची बाब उघड झाली होती. याचबरोबर अग्नी 6 क्षेपणास्त्र आपणच विकसित केल्याच्या बढाया कुरुलकर झारासोबत चॅट करताना मारत होता . आपण लवकरच अग्नी 6 ची चाचणी घेणार असून त्यावेळी मी तुला कळवेन असं सांगत होता . एटीएसने प्रदीप कुरुलकराचे दोन मोबाईल, दोन लॅपटॉप आणि हार्ड डिस्क ताब्यात घेऊन त्यातील डेटा गोळा करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र करुळकरने आधीच हा सर्व डेटा डिलीट केला होता. मात्र फॉरेस्निस्क लॅबोरेटरीच्या साहाय्याने कुरुलकरने दिलीट केलेला हा डेटा पुन्हा मिळवण्यात आला. त्यातून हे सगळे धक्कादायक खुलासे झाले आहेत.

हेही वाचा-

Dr. Pradeep Kurulkar : …अन् तिला प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात येणार होती, कुरुलकरांच्या प्रकरणात एटीसचा नवा खुलासा

 

 

[ad_2]

Related posts