ODI World Cup 2023 Pakistan Government And PCB Asked ICC Written Assurance Pakistan Team’s Security India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ODI World Cup 2023 : विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतात संघ पाठवण्याबाबत पाकिस्तान सरकारचं अद्यापही रडगाणं सुरुच आहे. आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतरही अद्याप पाकिस्तान सरकारकडून हिरवा झेंडा मिळालेला नाही. पाकिस्तान संघाला भारतात मिळणाऱ्या सुरक्षेबाबत लेखी हमी द्या, अशी मागणी पाकिस्तानने आयसीसीकडे केली आहे. यंदाच्या वनडे विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 

2008 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये दौरा करण्यास नकार दिला होता. मागील दोन वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये संघांनी जाण्यास सुरुवात केली आहे. ज्या देशात दुसऱ्या संघावर दहशतवादी हल्ला होतो, तो देश आज सुरक्षेची हमी मागत आहे.  विश्वचषकाची तयारी सुरु झाल्यापासूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खोडा घातला आहे. 

पाकिस्तान भारतात येईल – आयसीसीला विश्वास

वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर पीसीबीने भारतात येण्याबाबत अद्याप आम्हाला सरकारकडून परवानगी मिळाली नसल्याचे सांगितलेय. वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात जाण्यासाठी अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे पीसीबीने वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सांगितलेय. पण पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येईल, अशी आशा आयसीसीला आहे. पाकिस्तानसह सर्वच देशांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या करारावर याआधी सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान विश्वचषकासाठी भारतात येईल, असे आयसीसीच्या सर्वच सदस्यांना वाटतेय. सर्व संघाना त्यांच्या देशाच्या कायद्यांचे पालन करावे लागेल आणि आम्ही त्याचा आदर करतो. परंतु आम्हाला विश्वास आहे की विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येईल, असे आयसीसीने म्हटलेय. 2016 मध्ये पाकिस्तिनचा संघ टी 20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलली –

विश्वचषकादरम्यानच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलली. 15 ऑक्टोबर ऐवजी आता 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. नवरात्रीमुळे सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

अहमदाबादमधील हॉटेल्सच्या किमतीमध्ये वाढ –

गेल्या महिन्यात आयसीसी आणि बीसीसीआयने विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमवर आयोजित करण्यात आलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामुळे अहमदाबाद येथील हॉटेल्सच्या दरातही वाढ झाली. विमानाची तिकिटेही वाढली इतकच काय लोकांनी रुग्णालयात बेड बूक करण्यास सुरुवात केली होती. चाहत्यांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागला, आता आणखी एक मोठं आव्हान चाहत्यांसमोर उभं राहण्याची शक्यता आहे. सामन्याच्या तारखेत बदल झाला तर सर्व नियोजन पुन्हा एकदा करावे लागणार आहे. राहण्यापासून ये-जा करण्यापर्यंतची बुकिंग करावी लागणार आहे. 



[ad_2]

Related posts