Kareena Kapoor Khans Nutritionist Rujuta Diwekar Explained About Healthy Indian Superfoods; ऋजुता दिवेकरने सांगितला निरोगी राहण्यासाठी उत्तम उपाय, भारतीय सुपरफूड्सचा खजिना ठरेल वरदान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

तूप – चरबी जाळणारा पदार्थ

तूप - चरबी जाळणारा पदार्थ

आरोग्यासाठी चमत्कारी ठरणाऱ्या गुणधर्माने ओळखले जाणारे तूप हे अत्यंत फायदेशीर ठरते. ऋजुता दिवेकरच्या मते, तुमच्या अन्नातील ग्लिसेमिक इंडेक्स घटविण्याचे काम तूप करत असते.

डायबिटीस आणि वजन कमी करणाऱ्या व्यक्तींसाठी तूप हे उत्तम ठरते. शरीराला आवश्यक असणाऱ्या फॅटी अ‍ॅसिडचे गुणधर्म तुपात असल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. आहारात रोज १ चमचा तुपाचा तरी उपयोग करून घ्यायला हवा.

कोकम – नैसर्गिक अँटासिड

कोकम - नैसर्गिक अँटासिड

चांगली झोप आणि हृदयाच्या आरोग्यासाठी विटामिन बी१२ आणि डी चा स्तर योग्य राखण्यासाठी कोकम अत्यंत उपयोगी ठरते. बॅक्टेरिया आणि इन्फ्लेमेशनसह दोन हात करून कोकममधील हायड्रॉक्सी सिट्रीक अ‍ॅसिड हे वजन कमी करण्यासाठीही मदत करते. आमटी, भाजीसारख्या पदार्थांमधून तुम्ही कोकमाचा वापर करू शकता आणि तुमच्या आरोग्यासह त्वचेसाठीही कोकम खाणे उत्तम ठरते.

(वाचा – हनीमून सिस्टायसिस म्हणजे काय? या त्रासापासून कसे वाचता येईल)

केळं – उर्जा मिळविण्यासाठी उत्तम

केळं - उर्जा मिळविण्यासाठी उत्तम

केळं हे असं फळ आहे जे आरोग्यासाठी अत्यंत हेल्दी ठरते. केळ्यामध्ये असणारे पोटॅशियम आणि विटामिन बी६ हे तुमच्या शरीरात उत्तम उर्जा राहून वजन कमी करण्यासाठीही उत्तम ठरते.

केळ्यातील फायबरमुळे पोट भरलेले राहाते आणि लवकर भूक लागत नाही. पचनक्रिया उत्तम करून तुमच्या हाडांना बळकटी देण्यासाठीही केळं उत्तम ठरते. त्यामुळेच याला सुपरफूड असं म्हटलं जातं असंही ऋजुताने स्पष्ट केले.

(वाचा – दुसऱ्याच दिवशी पिवळ्या दातावरील थर होईल नाहीसा, दात होतील क्लीन व्हाईट अशी बनवा टूथ पावडर)

अंबाडीची भाजी

अंबाडीची भाजी

पावसाळ्यात सर्वात जास्त आजार होतात. मात्र पावसाळ्यात येणारी अंबाडीची भाजी ही अत्यंत आरोग्यवर्धक ठरते असं ऋजुताने सांगितलं आहे. फॉलिक अ‍ॅसिड आणि लोहाचे चांगले प्रमाण या भाजीतून शरीरात जाते.

पचायला अत्यंत हलकी आणि शिजवायला सोपी अशी ही भाजी तुमच्या गट हेल्थची अत्यंत काळजी घेते. फायबरयुक्त भाकरीसह खाल्लेली अंबाडीची भाजी ही शरीराला चांगले गुणधर्म मिळवून देते.

(वाचा – सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे)

नारळ – शांतता राखण्यास मदत

नारळ - शांतता राखण्यास मदत

पोटात वेगवेगळे पदार्थ जाऊन जळजळ होत असेल अथवा अपचन होत असेल नारळ हा पदार्थ एक प्रकारे सुपरफूडच ठरतो. एखाद्या गाडीला जशी इंधनाची गरज असते तशीच खोबऱ्याची शरीराला गरज असतं असं ऋजुता दिवेकरने आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

हायड्रेशनसाठी शहाळ्याचं पाणी तर आतड्याच्या आरोग्यासाठी मलई उत्तम ठरते. याशिवाय चांगली त्वचा आणि केस मिळण्यासाठीही याचा उपयोग होतो.

[ad_2]

Related posts