Pune Crime News 72 Year-old Grandmother Threatened To Blow Up Pune Airport With Bombs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News :  पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. त्यातच (Pune crime news) आता दिल्लीकर असलेल्या आजीला विमानतळावर पुणेरी बाणा दाखवणं प्रचंड महागात पडलं आहे. एका 72 वर्षाच्या आजीने थेट पुणे विमानतळ बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी दिली. विमानतळावर सुरक्षा तपासणीत वेळ लागल्याने  धमकी दिली. मात्र ही धमकी देणं आजीला चांगलंच महागात पडलं. या आजीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे एअरपोर्टवर बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देत अफवा पसरवणाऱ्या या आजीवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निता प्रकाश कपलानी (वय 72) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. दिल्लीची रहिवासी असलेली कपलानी यांनी “माझ्याजवळ चारही  बाजूला बॉम्ब आहेत, असे एअरपोर्टच्या महिला पोलीस अधिकाऱ्याला सांगतल्यानंतर घाबरलेल्या प्रशासनाची धावपळ उडाली

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार आज सकाळी 8:30 वाजता पुणे विमानतळावर घडला. ही महिला पुणे ते दिल्ली या विमानाने प्रवास करणार होत्या. दरम्यान सुरक्षा तपासणी दरम्यान बूथमध्ये पोलीस अधिकारी जेव्हा त्यांचा तपास करत होत्या तेव्हा त्यांनी “एवढं काय तपासत आहेत? माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो चारही बाजूने” असं सांगताच विमानतळावर गोंधळ उडाला.या महिलेवर गुन्हा दखल असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे.

यंत्रणा लागली कामाला…

महिलेने विमानतळावर गोंधळ घातल्याने त्यातही बॉम्ब असल्याची धमकी दिल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्यामुळे पुणे पोलीस यंत्रणा आणि बॉम्ब स्कॉड कामाला लागली. किमान तासभर महिलेची चौकशी केली असता महिलेने रागाच्या भरात सगळी धमकी दिल्याचं समोर आलं. विमानतळावर चेकिंगसाठी उशीर होत असल्याने ही महिला वैतागली आणि राग अनावर होऊन बॉम्ब असल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर यंत्रणा कामाला लागल्यानंतर पोलिसांनी थेट या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

अफवा पसरवली अन् थेट गुन्हा दाखल झाला…

विमानतळावर सकाळी बऱ्याच फ्लाईट्स असतात. त्यामुळे तपसानीसाठी  किंंवा चेकिंगसाठी उशीर होतो. परिणामी नागरिकांना कदाचित त्रास सहन करावा लागत असेल. मात्र त्यासाठी अशी धमकी देणं कितपत योग्य आहे हे पाहणं महत्वाचं आहे. कारण एका धमकीमुळे यंत्रणा कामाला लागली आणि काही वेळ विमानतळावर गोंधळ उडाला होता. 

हेही वाचा-

महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, 15 ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट

 

 

 

[ad_2]

Related posts