D2M Technology People Can Watch Live TV And OTT Without Any Internet Know In Detail News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Live TV on Phones without Internet : आजकाल इंटरनेटशिवाय लोकांचे पान देखील हालत नाही. आजच्या युगात कोणत्याही कामासाठी इंटरनेट लागते. तासंतास लोक सोशल मिडीयावर घालवतात. मात्र आता लवकरच तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय लाइव्ह टिव्ही आणि चित्रपट पाहता येणार आहेत. त्याकरता एक नवे तंत्रज्ञान विकसीत करण्यात येत आहे. म्हणजेच तुम्हाला कोणतेही सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही आणि हे शक्य आहे डायरेक्ट-टू-मोबाइल म्हणजेच D2M ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञानाद्वारे. दूरसंचार विभाग (DoT), माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB) तसेच IIT-कानपूर या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होऊ शकते. या बैठकीनंतर या प्रकरणी अंतिम निर्णयही येऊ शकतो. असे सांगण्यात आले आहे. 

डायरेक्ट-टू-मोबाइल ब्रॉडकास्ट म्हणजे काय?

डायरेक्ट-टू-मोबाइल ब्रॉडकास्ट (D2M) म्हणजे व्हिडिओ आणि इतर  मल्टीमीडिया थेट तुमच्या मोबाइलवर प्रसारित करणे किंवा ब्रॉडकास्ट करणे. सोप्या भाषेत सांगायचे तर, इंटरनेट, केबल किंवा डीटीएच शिवाय, तुम्हाला बातम्या, क्रिकेट इत्यादींचे थेट मोबाईल फोनवर व्हिडिओ प्रसारण करण्याची सुविधा मिळेल. यासोबतच, चित्रपटांपासून ते Hotstar, Sony Liv, Zee Five, Amazon Prime आणि Netflix यासारख्या टॉप अॅप्स आणि इतर मल्टीमीडिया इंटरनेटशिवाय थेट तुमच्या फोनवर प्रसारित केली जाऊ शकते.

D2M तंत्रज्ञानामुळे मोबाईल ग्राहकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. याद्वारे, ते कोणताही मोबाइल डाटा खर्च न करता थेट त्यांच्या मोबाइलवर व्हिडिओ किंवा इतर अनेक गोष्टी पाहू शकतात. मुख्य म्हणजे त्यांना ही सुविधा अतिशय कमी खर्चात मिळणार आहे. याच्या मदतीने ग्रामीण भागात राहत असलेल्या मोबाइल ग्राहकांना देखील व्हिडिओ सहज पाहता येणार आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा नाही किंवा मर्यादित आहे ते लोकही याचा लाभ घेऊ शकणार आहेत. 

भारत हा जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आकडेवारी, देशात 1.2 अब्ज मोबाइल फोन आहेत, त्यापैकी सुमारे 750 दशलक्ष स्मार्टफोन आहेत. देशातील 80% पेक्षा जास्त इंटरनेट वापरकर्ते त्यांच्या मोबाईलवर इंटरनेट वापरतात.

टेलिकॉम कंपन्या या तंत्रज्ञानाला करू शकतात विरोध

वास्तविक, दूरसंचार कंपन्या D2M तंत्रज्ञानाला विरोध करू शकतात कारण त्याचा त्यांच्या डेटा रिचार्जवर परिणाम होईल. जेव्हा लोक लाइव्ह टीव्ही इत्यादी विनामूल्य पाहू शकतात, तेव्हा ते डेटा रिचार्ज कमी करतील आणि यामुळे टेलिकॉम कंपन्यांचे नुकसान होईल.

इतर महत्वाच्या बातम्या

Poco M6 Pro 5G Launched : Poco चा M6 Pro 5G बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च; किंमत 10,000 पेक्षाही कमी

[ad_2]

Related posts