Pune Ngo Yuva Spandan Younsters Celebrate Friendship Day 2023 With Pune Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Friendship Day 2023 :  सध्या सगळीकडेच गुन्हेगारी वाढत आहे. (Friendship Day 2023) त्यात प्रत्येकच गोष्ट पोलिसांपर्यंत योग्य वेळी पोहचत नाही, त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसतेय. हे गुन्हे किंवा अशा घटना थांबवण्यासाठी पुण्यातील युवा स्पंदन संस्थेच्या तरुणांनी फ्रेंडशिप डे निमित्त अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पार्टी आणि पर्यटन सोडून पोलिसांसोबत फ्रेन्डशिप हे साजरा करुन पोलिसांशी मैत्री केली आहे. 

पुण्यातील विविध भागात आज या संस्थेच्या तरुणांनी पोलीस काकांना फ्रेंडशिपचा धागा बांधून त्यांच्यासोबत असलेलं नात घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनीदेखील या उपक्रमाचं कौतुक केलं. आपल्यातील प्रत्येकाच्याच आयुष्यात मैत्रीला अनन्यसाधारण मैत्री आहे. या मैत्रीत स्वार्थाची भावना नसते. मात्र हिच मैत्री जर पोलिसांशी केली तर यातून अनेकांमध्ये संवाद वाढू शकतो आणि सध्या निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचा सामना करु शकतो, असं युवा स्पंदनचे तरुण सांगतात. 

सलग 12 वर्षांपासून पोलिसांशी मैत्री…

युवा स्पंदन संस्था गेली 12 वर्ष पुणे शहर आणि जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. विविध सामाजिक तसेच विधायक उपक्रमांचे आयोजन करत असते. यातीलच हा उपक्रम म्हणजे पोलीस बांधवांसोबतचा मैत्री दिन असतो. तरुणाई आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये उगाचच पोलिस बांधवांविषयीची नकारात्मक प्रतिमा तयार झालेली असते त्यामुळे यांच्या मधल्या संवादात मोठी दरी असते आणि या कारणामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यमध्ये सुसंवाद घडत नाही. हा सुसंवाद घडावा आणि दोघांनी एकत्रित येऊन समाजात सामजिक ऐक्य तसेच शांतता राखण्यासाठी आणि गुन्हे रोखण्यासाठी जे काही प्रयत्न करू शकतो का? यावर चर्चा व्हावी यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरताना दिसत आहे. 

शहरात विविध उपक्रम…

पुण्यात अनेक संस्था सामाजित कार्य करत असतात. मात्र युवा स्पंदन संस्थेमार्फत शहरात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत असतात. यात रक्तदान शिबिर, गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून ते कोरोनात रिक्षा चालकांना मदत करण्यापर्यंचे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. 

‘टु गेदर वी कॅन’

एकच माणूस समाजात चांगला बदल घडवून आणू शकतो. मात्र जर तरुणाई एकत्र आली तर चांगला बदल घडवण्यासाठी आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी मदत करु शकते. भारतात 67 टक्के तरुणांची संख्या आहे. त्यामुळे एखादी वाईट वृत्ती रोखण्यासाठी किंवा बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा पुढाकार महत्वाची भूमिका बजावतात. 

इतर महत्वाच्या बातम्या-

Pune Metro : पक्के पुणेकर! शेवटी पुणेकरांनी मेट्रो हात दाखवून थांबवलीच; व्हिडीओ पाहून तुम्हीही ठेवाल डोक्यावर हात

[ad_2]

Related posts