Punekar Man Stop Metro By Wave Hand Make St Stand Funny Video Viral Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Metro :  काही दिवसांपूर्वीच पुण्यातील पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं. मात्र पहिल्या टप्प्यापासूनच वेगवेगळ्या कारणांवरुन मेट्रोची चांगलीच चर्चा झाली. मात्र आता पुणे मेट्रो थेट हात दाखवून थांबवल्यामुळे पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. या सगळ्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मेट्रो प्लॅटफॉर्मवर थांबून परत निघालेली असताना दोन व्यक्तींनी हात करून मेट्रो थांबवली आणि मेट्रो थांबलीही. दोघेही आरामात मेट्रोलत चढले आणि मेट्रोल पुन्हा मार्गस्थ झाले.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आधीच अनेक कारणांवरुन ट्रोल झालेल्या मेट्रोचं पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग सुरु झालं आहे. “नशिब हात दाखवून थांबवली नाहीतर एक राईड चालवून चेक केलं असतं व्यवस्थित चालते का मेट्रो?”, “पुणेकर भविष्यात विमानसुद्धा थांबवतील”, “पुणेकर काही करू शकतात… अगदी काहीही…!”, “आम्ही पुणेकर बुलेट ट्रेन हात दाखवून थांबवू शकतो… ही तर साधी मेट्रो आहे”, अशा कमेंट्स पुणेकरांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती घाईघाईत मेट्रो स्थानकावर येते आणि ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन केबीनचे दार वाजवताना दिसत आहे आणि त्याला दरवाजे उघडण्याची विनंती करताना दिसत आहे. त्यानंतर मेट्रोचे दारं उघडतं आणि व्यक्ती मेट्रोत बसते. तर दुसरा एक व्यक्तीसुद्धा उशीर झाला असताना पळत, घाईघाईत निघालेल्या मेट्रोला हात करून दरवाजे उघडण्याची विनंती करताना दिसत आहे आणि नंतर बसून प्रवास करतात. हा व्हिडीओ लोको पायलेटच्या केबीनच्या दरवाजाजवळ म्हणजेच मेट्रोचा चालक बसतो त्या पहिल्या डब्ब्याजवळ प्लॅटफॉर्मवरुन शूट करण्यात आला आहे. मेट्रोचे दरवाजे बंद होतात. सिव्हिल कोर्ट स्थानकावरुन पिंपरी-चिंचवडसाठी सुटणाऱ्या मेट्रोचा हा व्हिडीओ आहे.

पुण्यातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर गर्दीदेखील होताना दिसत आहे. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे हा टप्पा सुरु झाल्यापासून अति प्रमाणात गर्दी होत आहे. 

पुणे मेट्रोतील करामती व्हायरल…

पुणे मेट्रोतील करामती अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. मागच्यावेळी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशन, भजन करण्यात आलं होतं. याच सगळ्या करामती आणि पुणे मेट्रोचा होणार उपयोग पाहून पुणे मेट्रोनं नागरीकांना वेगळेवेगळ्या प्रकारचे सोहळे साजरे करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यात वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार आहे. त्यासोबतच ढोल ताशाचं वादनही करण्यात आलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Pune metro whatsapp Ticket : पुणे मेट्रो सुसाट, स्थानकावर तिकीटांसाठी रांगा, WhatsApp वरुन घरबसल्या करा मेट्रोचं तिकीट बुक, ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स



[ad_2]

Related posts