World Cup 2023 Pakistan Will Send Psychologist To India with Team; वर्ल्ड कप पूर्वीचं पाकिस्तानला मोठं टेन्शन, टीमसाठी घेणार महत्त्वाचा निर्णय, पीसीबीच्या हालचाली सुरु

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : यंदाचा आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होणार आहे. वर्ल्ड कपच्या सुरुवातीसाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान वर्ल्ड कपचं भारतात आयोजन केलं जाणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. या संघांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. सर्वजण ज्या सामन्यासाठी उत्सुक आहेत तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या वर्ल्ड कप साठी कप्तान बाबर आजम याच्या टीमसोबत मानसिक आरोग्य तज्ज्ञ देखील पाठवण्याचा विचार करत आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना दबावाचा सामना करता यावा यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, पीसीबीचे कार्यकारी अध्यक्ष जाका अशरफ आणि कप्तान बाबर आजम यांच्यातील भेटीनंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. बाबर सध्या लंका प्रीमियर लीग मध्ये कोलंबो स्ट्राइकर साठी खेळत आहे.

एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार ‘जाका अशरफ ज्यावेळी यापूर्वी पीसीबीचे अध्यक्ष होते. त्यावेळी क्रिकेटर्सच्या मदतीसाठी नामांकित मानसिक आरोग्य तज्ज्ञ मकबूल बाबरी ला बोलवण्यात आलं होतं. मकबूल बाबरी 2012-13 मध्ये पाकिस्तानच्या टीमसोबत भारताच्या दौऱ्यावर आले होते. पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी २०११ च्या वर्ल्डकप पूर्वी देखील प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये त्यांचे सामने हैदराबाद, कोलकाता, बेंगलुरु, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये खेळणार आहे.

डबल मर्डर करून पुण्याला फिरायला जाण्याचा प्लॅन; प्रेयसीकडे दीड कोटींचा चेक दिला, पण अचानक…; धक्कादायक माहिती उघड
भारतात यंदाचा वर्ल्ड कप स्पर्धा होणार असल्यानं सहभागी व्हायचं की नाही यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीत अहमान मजारी, मरियम औरंगजेब, असद महमूद, अमीन उल हक, कमर जमान कैरा आणि तारिक फातमी यांचा समावेश होता.
जळगावात गुन्हेगारासोबत पोलिसांचा झिंगाट डान्स, दीड वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण

भारत पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबरला होणार होता. मात्र, आता तो सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे. भारतानं एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये ७ सामन्यांमध्ये पराभव केला आहे. टी-२० मध्ये मात्र एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे.

अजित पवार म्हणाले त्यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम, शाहांच्या चेहऱ्यावर हास्य,फडणवीसांनी पुढची गोष्ट सांगितली

वडिलांच्या डोक्यावरून हात फिरवला, नितीन देसाईंच्या लेकीला अश्रू अनावर

[ad_2]

Related posts