Pune Jejuri Shashan Aplya Dari Devendra Fadanvis Praised Ajit Pawar As An Dasshing DCM

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Devendra fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तडफदार उपमुख्यमंत्री असा केला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडत आहे. पवारांच्या बालेकिल्यात महायुतीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. तडफदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या येण्याने आमच्या सरकारच्या कामाचा वेग कमालीचा वाढला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, लवकरच लोकांना कार्ड मिळणार आहेत. ती घेऊन दवाखान्यात गेलं की एक रुपये देखील उपचाराचा खर्च येणार नाही. पुण्याचा खरा विकास करायचा असेल तर पुरंदर एअरपोर्ट शिवाय विकास होऊ शकत नाही.  त्यामुळे कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता आपण काम केले पाहिजे.  मी काही पुण्यात निवडणूक लढवायला येणार नाही मी नागपूरमधुनच निवडणूक लढवणार आहे.  मात्र पुण्याचा खरा विकास करायचा असेल तर पुरंदरचा एअरपोर्ट झाला पाहिजे, असं ते म्हणाले.

सरकारच्या विविध योजना

सरकारने महिलांसाठी मोठी योजना आणली आहे. त्यामुळे प्रत्येक घरातील महिलांना अर्ध्य़ा तिकीटांमध्ये प्रवास करता येत आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासोबतच मुलगी जन्माला येणारं घर लखपती झालं पाहिजे यासाठी मुलगी जन्माला आली की 5 हजार रुपये, सातवीत गेली की 8 हजार रुपये आणि 18 वर्षांची झाली की 75 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील रस्ते, रेल्वे स्थानकांची कामं सुरु आहेत. पुण्यातील रिंग रोडचंदेखील काम सुरु कऱण्यात येणार आहे. त्यासोबतच सिंचनाच्या सोयीकरीता ज्या योजना पुढे य़ेतील त्यासाठी सरकार मदत करणार आहे. पुणे आणि पिंंपरी-चिंचडवडसह राज्यातील मोठ्या महापालिकांचं सांडपणी प्रक्रिया करुन उद्योगाला देण्याचा विचार सुरु आहे. असं केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. बचत झालेलं पाणी पुण्यात सिंचनाकरीता देणं शक्य असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. सगळ्यात मोठं एक्सपोर्ट मार्केट एअरपोर्टच्या माध्यमातून शेतीकरीता सुरु होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्य़ासाठी जे काही उपयोगाचं असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न सरकार करेल,अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच हा मोठा कार्यक्रम पवारांच्या बालेकिल्ल्यात होत आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे चार वेळा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पवारांच्याच बालेकिल्ल्यात पुणे जिल्ह्याचा विकास कसा होणार आहे, हे महायुती सरकारच्या नेत्यांनी सांगितलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या-

Nashik News : पेट्रोल न मिळाल्याने आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोल पंपावर तोडफोड, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद 

[ad_2]

Related posts