Asia Cup Schedule Timing Live Braodcast And Streaming Here Know Complete News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup Schedule & Timing: आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आशिया चषकाचे वेळापत्रक जारी केले होते. यंदाचा आशिया चषक एकदिवसीय स्वरुपात खेळवला जाणार आहे. आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय. आता सर्व सामन्यांच्या वेळाही समोर आल्या आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून खेळवले जातील.

आशिया चषकात भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर 2023 रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. हा सामना श्रीलंकामधील कँडी येथील मैदानात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ वगळता इतर सर्व संघ पाकिस्तानमध्ये किमान एक सामना तरी खेळणार आहे. 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

कधी कुठे पाहाल आशिया चषकाचे सामने?

आशिया चषकाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार, दुपारी तीन वाजता सुरु होणार आहेत. भारतीय चाहते आशिया चषकाचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येतील. त्याशिवाय  हॉटस्टार अॅपवरुनही सामन्यांचा आनंद घेता येईल. डीडी स्पोर्ट्स चॅनलवरही लाईव्ह सामना पाहाता येणार आहे. आशिया चषकाच्या ब्रॉडकास्टिंगचे राइट्स स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत.  त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे. 

विश्वचषकाआधी भारत आणि पाकिस्तानचा संघ आशिया चषकात आमनेसामने असतल. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे.  विश्वचषकाआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वेळा सामना होण्याची शक्यता आहे. 



[ad_2]

Related posts