Zomato Says 72 Percent Of Cod Orders Paid With Rs 2000 Notes Since Rbi Announcement

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zomato Tweet Viral: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) 2,000 रुपयांची नोट (2000 Rupees Note Exchange) चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. आजपासून सर्वांना कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलता येणार आहे. या नोटा बदलण्यासाठी लोकांना 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. 19 मे रोजी आरबीआयनं 2000 च्या नोटा चलनातून मागे घेत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. लोक घरात ठेवलेल्या 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी गडबड करु लागले आहेत. एरव्ही सर्रास युपीआय वापरणारेही 2 हजारांच्या नोटांनी व्यवहार करत आहेत. पण यासगळ्या गोंधळात मात्र आरबीआयला नोटा बदलण्यात झोमॅटो (Zomato) हातभार लावतंय की, काय? असा प्रश्न पडला आहे. कारण ठरतंय खुद्द झोमॅटोनं केलेलं एक ट्वीट. 

दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप Zomato नं एक मजेदार ट्वीट केलं आहे. झोमॅटोनं ट्वीट करून लिहिलं की, आरबीआयच्या घोषणेनंतर आता 72 टक्के सीओडी ऑर्डर लोक 2 हजार रुपयांच्या नोटांनी भरत आहेत. म्हणजेच जेवण ऑर्डर करण्यासोबतच लोक या अप्रतिम युक्तीनं 2000 रुपयांच्या नोटाही बदलून देत आहेत. यासोबत Zomato नं एक मजेशीर ट्वीट देखील केलं आहे, ज्यामध्ये कंपनीनं लिहिलं आहे की-

Zomato स्वतःचा UPI सुरू करणार 

मीडिया रिपोर्टनुसार, Zomato UPI सेवा सुरू करत आहे, ज्यामुळे युजर्सना पेमेंट करणं सोपं जाईल. UPI लाँच करण्याचा उद्देश ग्राहकांसाठी ऑनलाईन पेमेंट सुलभ व्हावं हाच आहे. आतापर्यंत असं होतं की, लोक Zomato ऑर्डरसाठी Google Pay, PayTm आणि इतर UPI अॅप्सद्वारे पैसे देतात. झोमॅटोवरुन पार्सल मागवल्यानंतर त्याचं पेमेंट करण्यासाठी त्यांना इतर अॅप्सवर स्विच करावं लागतं. त्यामुळेच ग्राहकांसाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी Zomato स्वतःचं UPI नेटवर्क आणत आहे, जेणेकरून लोक अॅपवरूनच पेमेंट करू शकतील.

Zomato UPI साठी, युजर्सना बँक तपशील टाकून नवीन UPI ​​ID तयार करावा लागेल आणि Zomato अॅपवरूनच पैसे द्यावे लागतील. सध्या Zomato UPI सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही आणि फक्त काही निवडक लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. लवकरच कंपनी युपीआयची सुविधा सर्वांसाठी आणू शकते. 

Zomato UPI सेवा सुरू

नुकतीच झोमॅटोने यूपीआय सेवा सुरु केली आहे. ही सेवा सुरु करण्यामागील कंपनीचा मुख्य उद्देश्य, लोकांसाठी ऑनलाईन पेमेंटची चांगली सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे. या यूपीआय सेवेमुळे ग्राहकांना झोमॅटो अॅपच्या माध्यमातून पेमेंट करणे अत्यंत सोपं होणार आहे. परंतु, यासाठी ग्राहकांना कोणतेही एक बँक खाते सेव्ह केल्यानंतर नवीन यूपीआय ओळखपत्र बनवावं लागणार आहे. तसेच, सध्या जे लोक पेमेंट करण्यासाठी Paytm, PhonePe आणि Google Pay सारख्या यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत त्यांना त्यावर रिडायरेक्ट करण्याची आवश्यकता पडणार नाही.



[ad_2]

Related posts