DRDO Dr. Pradeep Kurulkar News Update Pune Ats Says Dr. Pradeep Kurulkar Delete Mobile App From His Mobile

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dr. Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकर (Pradip Kurulkar) यांनी त्यांच्या मोबाईलमधील काही ॲपस डिलीट केले आहे, असा अहवाल पुणे फॉरेन्सिक लॅबोरेटरीने दिला आहे. हे ॲप्स ओपन करुन प्रदीप कुरुलकर यांनी आणखी कोणती माहिती पाकिस्तानला दिली आहे का? याचा तपास ATSला करायचा आहे. त्यासाठी कुरुलकरांचा  वन प्लस 6T हा मोबाईल गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पुढच्या तपासासाठी पाठवण्याची परवानी ATSने न्यायालयाकडे मागितली आहे. कुरुलकंरांच्या जामीन अर्जावर म्हणणं मांडण्यास ATSने 18 ऑगस्टपर्यंत मुदत मागून घेतली आहे.

कुरुलकरांच्या वकिलांनी मोबाईल गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्याला विरोध नसला तरी पाठवण्यात येणारा मोबाईल कुरुलकंरांचाच आहे का? हे IMEIनंबर तपासून खात्री करून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कुरुलकरांनी त्यांच्या मोबाईलमधील वॉट्सअप चॅट डिलीट केले होते. ATSने हे चॅट पुणे फॉरेन्सिक लॅबोरेटरीतून प्राप्त केले आणि त्याआधारे कुरुलकरांवर दोषारोपपत्र दाखल झालं. मात्र कुरुलकरांच्या मोबाईलमधील काही ॲप ओपन करण्यात पुणे फॉरेन्सिक लॅबोरेटरीला अपयश आल्याने तो मोबाईल गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्याची ATSची मागणी आहे. 

‘कुरुलकर तपासात सहकार्य करत नाहीत’

प्रदीप कुरुलकर झारा दास गुप्ता हिच्याशी चॅटिंग करत होते. त्यांच्याकडे एकपेक्षा अधिक फोन चौकशी दरम्यान आढळले होते. या फोनमध्ये झारा दास गुप्ता आणि त्यांच्यामध्ये झालेलं संभाषण समोर आलं होतं. त्यामुळे डिलिट केलेल्या डेटामध्ये भारतीय लष्करासंदर्भात तसेच झारा शी केलेल्या चर्चेचे चॅटिंग असण्याची शक्यता होती. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील यांनी न्यायालयात नमूद केले होतं. 

Whatsapp चॅट काय होते?

या दोघांनी 19 ऑक्टोबर 2022 ते 28 ऑक्टोबर 2022 दरम्यान ब्राह्मोसबद्दल संभाषण केलं आहे. झारा या महिलेने कुरुलकरांना विचारले की, बेब ब्राह्मोस हा देखील तुमचा शोध आहे का? यावर कुरुलकरांनी उत्तर दिलं की, मी ब्रह्मोसच्या सर्व प्राथमिक आवृत्यांचा अहवाल तयार केला आहे. पण मी तो तुला असा व्हॉट्सअप अथवा मेलवर दाखवू शकत नाही. मी तुला भेटून तो दाखवण्याचा प्रयत्न करेन. ATS ने आरोपपत्रात 28 ऑक्टोबर 2022 च्या या चॅटचा विशेष उल्लेख केला आहे. तसेच एटीएसने दावा केला आहे की, ही माहिती अत्यंत गोपनीय आहे त्यामुळे ती व्हॉट्सअॅप आणि ईमेलवर शेअर केली जाऊ शकत नाही. हे माहीत असूनही, कुरुलकर यांनी झाराला भेटून ती माहिती दाखवण्याचे सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण येणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या-

[ad_2]

Related posts