Mumbai news mhada lottery date fixed for august 14

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 082 घरांची सोडत कधी निघणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते (Mhada Lottery 2023). अखेर या सोडतीला मुहूर्त मिळाला आहे.

ऑगस्ट महिन्यातच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे (Housing Minister Atul Save) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. 

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची येत्या 14 ऑगस्टला लॉटरी काढली जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिली.

सावे यांनी आज गृहनिर्माण खात्याचा आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नातही लक्ष घालण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिली. मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या 4082 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता १४ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज दिली.

मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ०१,२०,१४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती अतुल सावे यांनी दिली.

सर्व अर्जदारांची प्रतीक्षा व उत्सुकता लक्षात घेता १४ ऑगस्ट रोजी मुंबई मंडळाच्या सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.

कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याचे सावे यांनी संगितले.


[ad_2]

Related posts