Vandalism Of The Office Of The Corrupt Dean A Case Has Been Registered Against MNS Officials And Workers In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News :  वैद्यकीय महाविद्यालयात लाचखोर डीनच्या  (ACB Trap) कार्यालयाची तोडफोड मनविसेच्या कार्यकर्त्यांना चांगलीच भोवली आहे. पुण्यात मनसे पदाधिकारी (MNS) आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ आशिष बनगिनवार यांच्या कार्यालयाची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी काल केली होती. याप्रकरणी आता पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अधिक माहितीनुसार, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला (डीन) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) अटक केली होती. या संबंधित जाब विचारण्यासाठी मनसेकडून काल महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने त्यांच्या खळखट्याक पद्धतीने आंदोलन करत बनगिनवार यांच्या केबिनची तोडफोड केली. या तोडफोडीमध्ये दोन कम्प्युटर आणि खुर्च्यांचे नुकसान झाले. यामुळे मनसेच्या आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी आणि इतर 5 ते 6 जणांवर सार्वजनिक संपत्तीस हानी पोहचवली म्हणून गुन्हा दखल करण्यात आला आहे.

कॉंग्रेस अन् मनविसे आक्रमक…

महाविद्यालयातील डीन विरोधात मनसे आणि कॉंग्रेस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.कॉग्रेसच्य़ा नेत्यांनी कार्यलयात शाईफेक केली तर मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याचं बघायला मिळालं. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?

महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या डीनचं नाव आशिष श्रीनाथ बनगिनवार (वय 54) असे आहे. लाचेची मागणी केल्याबाबत पुण्यातील 49 वर्षीय डॉक्टर यांनी तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष श्रीनाथ बनगिनवार हे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचे डीन आहेत तर हे पुण्यातील एक मोठे डॉक्टर आहेत. दरम्यान तक्रारदाराचा मुलगा नीट परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून निवड झाली होती. अशिष यांनी प्रवेश फी व्यतिरिक्त 16 लाख रुपयांची मागणी केली होती. यातील 10 लाख रुपये घेताना अशिष यांना रंगेहाथ पडकलं होतं. 

इतर महत्वाची बातमी-

[ad_2]

Related posts