Pune News Baner Road Closed For Traffic For 4 Days From Tomorrow Know Alternative Route

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुण्यात मेट्रोचं काम जोमात सुरु आहे. दोन मार्गिकांचं (Pune News) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर शहरातील बाकी परिसरातील मेट्रोचं (Pune metro) कामदेखील प्रगतीपथावर आहे.  बाणेर रस्त्यावर ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन ते पल्लोड फार्म दरम्यान मेट्रोचे काम केले जाणार आहे. त्यामुळे 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान या रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

हे आहेत पर्यायी मार्ग…

– पुणे विद्यापीठ चौकाकडून अभिमान श्री जंक्शन येथून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाणेर फाटा चौकामधून उजवीकडे वळावे. ‘आयटीआय’ रस्त्यावरून परिहार चौक, डावीकडे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे, नागरस रस्त्यावरून महाबळेश्वर हॉटेलजवळ बाणेर रस्त्यावर जावे.

– ग्रीन पार्क हॉटेल चौकामधून डावीकडे वळण घेऊन सोमेश्वर मंदिरमार्गे राम नदीवरील पुलानंतर उजवीकडे वळण घेऊन पासपोर्ट कार्यालयासमोरून बाणेर रस्त्यावर यावे.

पीएमपी बसच्या मार्गांतही बदल

मेट्रोच्या कामामुळे रस्ता बंद राहणार असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पाच मार्गांवरील बसचे मार्गदेखील बदलण्यात आले आहेत. बस बाणेरकडे जाताना बाणेरफाटा चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय, परिहार चौकातून पुढे डावीकडे वळण घेऊन डीपी रस्त्याने आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मिडी पॉइंट हॉस्पिटलपासून डावीकडे वळण घेऊन लिंक रस्त्याने ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यावर येतील. त्यानंतर पुढे पूर्ववत मार्गाने बसचे संचलन सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळून अपघात

पुण्यात मेट्रो स्टेशनचा ( Pune Metro Station) लोखंडी भाग कोसळल्याची घटना घडली. पुण्यातील (Pune) येरवडा भागात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये  मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग स्टेशनच्या खालून जाणाऱ्या एका चारचाकीवर कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. महा मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला असून, नेमकी ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू आहे. मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कारवर पडला त्यावेळेस तिथे जर नागरिक असते तर दुर्दैवी घटना घडली असती. महा मेट्रोने येरवडा येथे सुरू असलेल्या स्टेशनच्या कामाचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करावे. तसेच कामाच्या दर्जाची तपासणी करावी, असं मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune metro whatsapp Ticket : पुणे मेट्रो सुसाट, स्थानकावर तिकीटांसाठी रांगा, WhatsApp वरुन घरबसल्या करा मेट्रोचं तिकीट बुक, ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

[ad_2]

Related posts