[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच उद्घाटन होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या पुलावरुन आता नाराजीनाट्य सुरु झालं आहे. या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. याच उद्घाटन सोहळ्यात डावलल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Megha Kulkarni) यांनी केला आहे. कोथरुडमधील सध्याचे नेते माझं अस्तित्व मिटवण्याचं काम करत असल्य़ाचं त्यांनी म्हटलंय. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं पोस्टर ट्विट करत त्यांनी हा आरोप केला आहे.
मेधा कुलकर्णींनी ट्विटमध्ये काय लिहिलंय?
‘माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितिन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?, असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
‘माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर’
‘मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, असं ट्विट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“Disappointed”
.
.#BJPKothrud #BjpPune pic.twitter.com/UEIV1lV40w
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) August 11, 2023
इतर महत्वाच्या बातम्या-
Pune Chandani Chowk : अखेर मुहूर्त ठरला! चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम पूर्ण; उद्घाटन कधी होणार?
[ad_2]