Tilak Varma Will Break Virat Kohli Record in T20 International IND vs WI; नवोदित तिलक वर्मा आता टी-२० मध्ये देणार विराट कोहलीला टक्कर, हा खास विक्रम आपल्या नावे करणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

फ्लोरिडा: सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज (IND vs WI) दौऱ्यावर आहे. जिथे भारत यजमान संघासमोर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. त्याचवेळी या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये वेगवान फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माकडे कोहलीला मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. तिलकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांत ३० हून अधिक धावा केल्या, त्यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. तर जाणून घेऊया आता तिलक वर्मा विराट कोहलीचा कोणता विक्रम आपल्या नावे करणार आहे.

तिलकला इतक्या धावांची गरज

तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तीन सामन्यांमध्ये आतापर्यंत १३९ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिलकने पदार्पणाच्या सामन्यात ३९, दुसऱ्या सामन्यात ५१ आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद ४९ धावा केल्या. आता भारतासाठी द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर आहे.

आशिया चषकापूर्वी या संघाने कर्णधारच बदलला, आता तिन्ही फॉरमॅट एकच कॅप्टन असणार
जर त्याला या यादीत पहिल्या क्रमांकावर यायचे असेल तर या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तिलक वर्माला ९३ धावा कराव्या लागतील. असे केल्याने, तो विराट कोहलीला मागे टाकून भारतासाठी द्विपक्षीय टी-२० मालिकेतील नंबर वन फलंदाज बनणार आहे.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCI ची, २७,००० कोटींहून अधिकची बंपर कमाई; टॅक्सची किंमतही आहे तगडी
सध्या विराट कोहली भारतासाठी द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. ज्याने मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत २३१ धावा केल्या होत्या. या यादीत केएल राहुलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, राहुलने जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २२४ धावा केल्या होत्या.

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक; क्रिस गेलचा विक्रम मोडीत, फक्त इतक्या चेंडूत १०० धावा
भारतासाठी द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

१. विराट कोहलीने मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध २३१ धावा केल्या होत्या.
२. केएल राहुलने जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २२४ धावा केल्या
३. इशान किशनने जून २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०६ धावा केल्या होत्या
४. श्रेयस अय्यरने जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १५३ धावा केल्या.
५. तिलक वर्माने आतापर्यंत ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १३९* धावा केल्या आहेत.

[ad_2]

Related posts