India Direct Tax Collection Rise 15 7 Percent To 6 53 Lakhs Crore Finance Ministry Marathi Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष करामध्ये (Direct Tax) विक्रमी वाढ झाली असून 10 ऑगस्टपर्यंत यामाध्यमातून 6.53 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या प्रत्यक्ष करामध्ये 15.73 टक्क्यांची वाढ झाल्यांच स्पष्ट आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातील प्रत्यक्ष कराच्या संकलनाच्या तुलनेत ही रक्कम 32.02 टक्के असल्याचं अर्थमंत्रालयाने सांगितलं आहे. 

यामधून जर करदात्यांना करण्यात आलेला रिफंड वजा केला तर नेट टॅक्स हा 5.84 लाख कोटी रुपये जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 17.33 टक्क्यांनी जास्त आहे.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत, निव्वळ प्रत्यक्ष करांचे संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 17.33 टक्के अधिक आहे. त्याच वेळी हा आकडा संपूर्ण आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या 32.03 टक्के इतका आहे. याचा अर्थ 2023-24 च्या संपूर्ण आर्थिक वर्षात सरकारच्या अंदाजे कमाईपैकी 32 टक्क्यांहून अधिक रक्कम 10 ऑगस्टपर्यंतच तिजोरीत आली आहे.

 

पूर्वीपेक्षा जास्त परतावा जारी केला

चालू आर्थिक वर्षात करदात्यांना अधिक परतावाही जारी करण्यात आल्याचे सरकारनं म्हटलं आहे. सरकारने एप्रिल ते 10 ऑगस्ट 2023 पर्यंत करदात्यांना एकूण 0.69 लाख कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यापेक्षा हे प्रमाण 3.73 टक्के अधिक आहे.

यंदाच्या वर्षी विक्रमी ITR दाखल, 16 टक्क्यांची वाढ

यंदाच्या वर्षात आयकर विवरण दाखल करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमाी वाढ झाली आहे.  31 जुलै 2023 पर्यंत एकूण 6.77 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. आयकर विभागाने ही माहिती दिली आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये एकूण 6.77 कोटी ITR दाखल करण्यात आले होते तर 2022-23 मध्ये 31 जुलै 2022 पर्यंत एकूण 5.83 कोटी ITR दाखल करण्यात आले होते. याचाच अर्थ 2022-23 च्या मूल्यांकन वर्षाच्या तुलनेत 2023-24 मध्ये 16.1 टक्के अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत.

एकाच दिवसात 64 लाख ITR दाखल

आयकर विभागाने सांगितले की, 31 जुलै 2023 रोजी एकाच दिवसात 64.33 लाख आयकर रिटर्न भरले गेले. 53.67 लाख जणांनी पहिल्यांदाच आयकर रिटर्न दाखल केले आहेत. टॅक्सबेसच्या संख्येत चांगली वाढ झाली असल्याचे हे संकेत असल्याचे म्हटले जात आहे. 

ही बातमी वाचा :



[ad_2]

Related posts