Pune Bjp Political News Chandrakant Patil Murlidhar Mohol Medha Kulkarni Kothrud Constituency In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोथरुड, पुणे :  पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन (Chandani Chawk Flyover) दिमाखात पार पडलं. मात्र या उद्घाटनापूर्वी पुणे शहरातील भाजप नेत्यांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. पुलाच्या उभारणीवरुन पुण्यातील भाजपच्या कोथरुडच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई बघायला मिळाली. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनावेळी डावलल्याचा आरोप करत कोथरुडच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी खड्या शब्दात नाराजी व्यक्त केली. तर त्यांच्या या नाराजीवर भाजपचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांनी हात जोडून त्यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.

कोथरुडमधील सध्याचे नेते माझं अस्तित्व मिटवण्याचं काम करत असल्य़ाचं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं होतं. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) आणि चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे तिघंही कोथरुडचं प्रतिनिधित्व करतात. 

मेधा कुलकर्णी कोथरुड मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. येत्या निवडणुकीत त्यांना ही जागा मिळावी म्हणून त्या प्रयत्न करत आहे. मूळचे कोल्हापूरचे असणारे चंद्रकांत पाटील हे आता आमदार आहेत आणि पुण्याचे माजी महापौर असलेले मुरलीधर मोहोळ हे आमदारपदासाठी फिल्डिंग लावत आहे. या येत्या तिघांनाही कोथरुड जिंकायचं आहे. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ हे सोबत काम करतात. मात्र मेधा कुलकर्णींना अनेक बाबतीत डावललं जात असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील भाजपचं राजकारण कोथरुड भोवती का फिरत आहे?

भाजपच्या उमेदवारांसाठी पुण्यातील कोथरुड हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. महाराष्ट्रात कॉंग्रेसची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. मात्र या कॉंग्रेसच्या काळात कोथरुड कॉंग्रेसला कधीही काबीज करता आलं नाही. भाजपची स्थापना होण्यापूर्वीदेखील कोथरुडमधून जनसंघाचा उमेदवार निवडून यायचा. एवढी कोथरुडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पकड आहे. तेव्हापासून RSS ला मानणारा मतदार या कोथरुड मतदारसंघात आहे. त्यामुळे कोथरुडला सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरुडची पुण्यात ओळख आहे.

चंद्रकांत पाटील यांना मेधा कुलकर्णींचा मतदारसंघ दिला अन्…

सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणूक लढवून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायचं ठरलं, तेव्हा पाटलांसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला गेला. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहे. त्यांच्यासाठी मतदार संघाची निव़ड करण्यासाठी मुंबई, विदर्भातला नाही तर पुण्यातला भापसाठी सुरक्षित असलेल्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाची निवड केली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णींना उमेदवारी डावलण्यात आली होती. तेव्हापासून म्हणजेच 2019 पासून मेधा कुलकर्णी नाराज होत्या. अनेकदा त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.

इतर महत्वाची बातमी-

Chandani Chowk Medha Kulkarni : चांदणी चौक खुला होणार; उद्घाटनापूर्वीच भाजपमध्ये नाराजीनाट्य, कार्यक्रमात डावलल्याचा मेधा कुलकर्णींचा आरोप

 

[ad_2]

Related posts