[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ABP Majha Zero Hour Show : ‘एबीपी माझा‘ (Abp Majha) आणि मराठी माणूस हे नातं काही नवं नाही. गेल्या सतरा वर्षांपासून तमाम मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच ‘एबीपी माझा’नं सातत्यपूर्ण नवे प्रयोग केले आहेत. हल्ली चुकीच्या बातम्या आणि बातम्यांच्या नावाखाली मनोरंजनाचा खेळ सतत सुरु असतो. यामुळे तुमचे आणि तुमच्या हक्काचे प्रश्न हे बाजूला राहतात. पण आता ‘एबीपी माझा’ तुमच्याच माध्यमातून तुमच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे. माझाच्या या कार्यक्रमात आता फक्त आमचे प्रतिनिधीच नाही तर तुम्ही देखील सहभागी होणार आहात. एबीपी माझाचा ‘झिरो अवर’ हा कार्यक्रम 14 ऑगस्ट पासून तुमच्या भेटीला येत आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.56 ची वेळ आता ही माझाच्या प्रेक्षकांची असणार आहे.
‘माझा’वर आता चर्चा जनहिताचीच
‘एबीपी माझा’च्या उपकार्यकारी संपादिका सरिता कौशिक हा ‘झिरो अवर’ हा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. राजकीय बातम्यांच्या वादळात सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या, नोकरदारांच्या सगळ्यात महत्वाचं महिलांच्या बातम्या बाजूला पडत असल्याचं चित्र सध्या आहे. यामुळे अनेक प्रश्न बाजूला राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक महत्त्वाचे विषय मागे पडतात. पण ‘माझा’ नेहमीच प्रत्येक विषय आपला म्हणून मांडत असतो. आता देखील तुमचे, आमचे, आपले प्रश्न नागरिकांना ‘माझा’च्या व्यासपीठावर मांडता येणार आहेत.
कसं व्हाल जनहिताच्या चर्चेत सहभागी
फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ‘झिरो अवर’ या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही सोशल मिडियावर ‘एबीपी माझा’ला फॉलो करत नसाल तर लगेच ‘एबीपी माझा’ला फॉलो करा. एबीपी माझाला फॉलो केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवण्यात येईल. ज्यात आम्ही दिवसभरातील एका महत्वाच्या विषयावर प्रश्न विचारणार आहोत. पण त्यावर तुम्ही उत्तर द्यायलाच हवं असं काही बंधनकारक नाही. त्या प्रश्नावर तुम्ही फक्त तुमचं मत दिलं तरी चालेल. त्याच विषयावर तुम्ही ‘माझा’च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनाही प्रश्न विचारु शकता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला ‘माझा’वर तुमचं मत मांडण्याची संधी देखील मिळणार आहे. म्हणजेच, सोशल मीडियावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया या आम्ही ‘माझा’च्या ‘झिरो अवर’ या कार्यक्रमात दाखवणार आहोत. त्यामुळे आता लगेच एबीपी माझाला सोशल मिडियावर फॉलो करा आणि तुमचं, तुमच्या विषयांचं मत मांडा.
[ad_2]