[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघाताचं सत्र (Pune Accident News) सुरुच आहे. दर दोन दिवसांनी या रस्त्यावर किरकोळ अपघात होत आहेत. कात्रज कोंढवा रस्त्यावर आज झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत एका वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कोंढव्यातील स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला.
या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. सलग होणाऱ्या अपघातांना त्रासून अखेर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आठवड्यातील तिसरा अपघात आहे. चार दिवसांच्या अंतराने कात्रज-कोंढवा रस्त्यावर दोन प्राणांतिक अपघात झाल्यानंतर आज पुन्हा एकदा अपघात झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आणखी किती बळी हवेत? अपघात सत्र कधीच थांबणार? कात्रज कोंढवा रस्तावर प्रवास करायचा का? यासह असंख्य प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
अपघात सत्र कधीच थांबणार? नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया
कात्रज कोंढवा रस्त्यावरील अपघाताचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज दुपारी वाजण्याच्या सुमारास ट्रकने दिलेल्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कोंढव्यातील स्मशानभूमी जवळ हा अपघात झाला असून कधी भूसंपादन व्हायचे? कधी निधी यायचा? कधी रस्ता रुंदीकरण होणार? आणखी किती बळी हवेत? अपघात सत्र कधीच थांबणार? कात्रज कोंढवा रस्तावर प्रवास करायचा का नाही? यासह असंख्य प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
भरधाव वेगाने गाडी चालकांवर कारवाई कधी?
पुण्यात अनेक परिसरात बेफाम गाड्या चालवत असणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांनी मनमानी थांबवण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यांच्या या मनामानीमुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या सगळ्या तरुणांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यासोबतच रस्त्याबाबतही नागरिकांच्या अनेक तक्रारी आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असते. रस्त्यांची रुंदी लहान आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचं प्रमाणही जास्त आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना राबवाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune BJP Political News : कोथरुडच्या भाजप नेत्याचं चाललंय काय? कुलकर्णी- पाटील यांच्या वादात जोशींची उडी, कुलकर्णींचे आरोप थेट फेटाळले
[ad_2]