Social Activist Kishor Aware Murder Case Bhanu Khalde Is Main Suspected Murder Case Pune Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kishor Aware Murder case: पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारेंच्या हत्या प्रकरणाने (Kishor Aware Murder case)आता नवं वळण घेतलं आहे. या हत्येचे मास्टरमाइंड हे त्यांच्याच समितीचे माजी नगरसेवक भानू खळदे असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याआधी, माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं आणि त्यानुसार गौरव खळदे याला अटक देखील करण्यात आली. मात्र या हत्येमागे गौरवचा प्लॅन नसून खुद्द भानू खळदेचा प्लॅन असल्याची कबुली गौरव आणि इतर आरोपींनी दिली आहे. त्यानुसार आता भानू खळदे यांनाही आरोपी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेसमोर जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण पुणे (Pune) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 12 मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर 7 जणांना अटक केलेली आहे, त्यांना आजा न्यायालयाने 25 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

भानू खळदे आणि किशोर आवारेंमध्ये डिसेंबर महिन्यात खडाजंगी

किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार केली होती, यावरुन भानू खळदे आणि किशोर आवारेंमध्ये डिसेंबर महिन्यात खडाजंगी झाली होती आणि त्यावेळी आवरेंनी खळदेंच्या कानशिलात लगावली होती. जुन्या नगरपरिषदेत सर्वांसमोर झालेल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी खळदे बापलेकाने किशोर आवारेंच्या हत्येचा कट रचला आणि अखेर 12 मे रोजी कामकाज सुरू असलेल्या नगरपरिषद कार्यालयासमोरच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 

माजी नगरसेवक भानू खळदे फरार

भानू खळदे सध्या फरार झाले असून दोन पथकं त्यांचा शोध घेत आहेत.  लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांना 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आणि त्यांची कसून चौकशी केली असता गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याचं तपासात समोर आलं. तिसऱ्या दिवशी गौरवला अटक केल्यानंतर पुढील चौकशीत वडील भानू खळदे हे या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी भानू खळदेंना आरोपी केलं असून त्यांचा शोध घेतला जातोय.

हेही वाचा:

Pune Crime News : धक्कादायक! जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू

[ad_2]

Related posts