Argument Between Guardian Minister Chandrakant Patil And Former Mla Medha Kulkarni Over Taking Credit For The Work Of Chandni Chowk Flyover Pune | Pune BJP Political News : कोथरुडच्या भाजप नेत्याचं चाललंय काय? कुलकर्णी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांच्या चांदणी चौक लोकार्पण कार्यक्रमावरुन कोथरुड भाजपामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मेधा कुलकर्णी पक्षाची शिस्त मोडत असल्याची चर्चा कोथरुडमधील कार्यकर्त्यांमध्ये सुरु असून भाजप कोथरुड अध्यक्ष पुनीत जोशी यांनी व्हिडिओ पोस्टकरुन मेधा कुलकर्णींचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणाच्या आदल्या दिवशी मेधा कुलकर्णींनी फेसबुक पोस्ट करत कोथरुडमधील सध्याचे नेते माझं अस्तित्व मिटवण्याचं काम करत असल्य़ाचा आरोप केला होता.

पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकाचे 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालं. मेधा कुलकर्णी यांच्या फेसबुक पोस्ट वरुन आता कोथरुड भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पक्ष शिस्त सातत्याने मोडत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. या संदर्भात भाजपा कोथरुडचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. मेधा कुलकर्णी यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

पुनीत जोशी यांनी आपल्या व्हिडीओ मधून म्हटलं आहे की, ‘पुणेकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन देशाचे वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्ट रोजी पार पडले. पण या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल माजी आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. साधे हँडबिलवर फोटो नाही हा त्यांचा आक्षेप होता पण याच वेळी शहरात 240 हॉर्डिंग्सवर यांचे फोटो होते, वृत्तपत्रातील जाहिरातीत यांचे फोटो होते. साधारण नाराजी असेल तर ती अशी जाहीर व्यक्त करायची नसते, ही पक्षाने आम्हाला दिलेली शिकवण आहे. पक्ष आधी नंतर आपण हे आपल्या पक्षाचे विचार आहेत. ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तुम्ही असे व्यक्त होणे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला पटले नाही म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय, अशी भावना पुनीत जोशी यांनी व्यक्त केली आहे.

मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या होत्या?

पुण्यातील चांदणी चौकातील  (chandrakant patil) प्रकल्पाचे उद्घाटनासाठी छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव आणि फोटो वापरण्यात आलेले नाहीत. यावरुन मेधा कुलकर्णी नाराज झाल्यात होत्या.  हे कोथरुडचे नेते आपले अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न असल्याचा सोशल मीडियावर त्यांनी लिहीलेल्या पोस्टमधे म्हटलं होतं.  चांदणी चौकातील हा प्रकल्प आपल्या आमदार पदाच्या कारकीर्दीत सुरु झाला आणि आपण त्याचा पाठपुरावा केला. मात्र आपल्याला जाणीवपूर्वक डावलल जात आहे आणि हे दुखः आपल्याला मानवत नाही, अस मेधा कुळकर्णी यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

[ad_2]

Related posts