[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Daund Crime: दौंडमध्ये डाॅक्टर महिलेला पतीनं केली मारहाण दौंड येथे कौटुंबिक वादातून डॉक्टर महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिला डॉक्टर ही पतीपासून 9 वर्षांपासून वेगळी राहत होती.. 14 तारखेला पतीने मुलीच्या मित्राला शिवीगाळ केली. मुलीनं याचं कारण विचारताच त्यानं तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या आईनं मध्यस्थी केल्य़ावर आरोपीनं तिलाही जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. पीडित महिलेनं पती, दीर आणि सासूविरोधात पोलिसांत तक्रार दिली, त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.
[ad_2]