[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Saghtana) फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानीचे युवा नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी संघटनेच्या नेतृत्वाबद्दल काही आक्षेप नोंदवले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकरांना आपले म्हणणे मांडण्यासाठीचा 15 ऑगस्टपर्यंत दिलेला अल्टीमेटम संपला आहे. त्यामुळं रविकांत तुपकर यांच्याबाबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रविकांत तुपकर हे गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या कार्यपाध्दतीवर नाराज आहेत. त्यांनी गेल्या काही काळात राजू शेट्टी यांच्यावर उघडपणे टीका देखील केलीय. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणालेत. त्यामुळं आता रविकांत तुपकर यांच्या मनात चाललंय तरी काय…? असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान, तुपकरांनी आपली भूमिका माध्यमांसमोर न मांडता त्यांनी शिस्तपालन समितीसमोर त्यांचं म्हणणं मांडावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. याबाबत पुण्यात आका बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र, रविकांत तुपकर त्या बैठकीला हजर राहिले नव्हते. या बैठकीत तुपकरांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता.
तुपकरांचे राजू शेट्टींना पत्र
दरम्यान, रविकांत तुपकर हे 15 ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर हजर झालेच नाही.
रविकांत तुपकरांनी आपले राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धती आणि भूमिकांबद्दल असणारे आक्षेप लेखी पत्राद्वारे राजू शेट्टी आणि समितीला पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
10 पानांचे भले मोठे पत्र तुपकरांनी राजू शेट्टींना पाठवल्याचे समजते. त्यामुळं आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्तपालन समिती पुढे काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रविकांत तुपकरांचं नेमकं म्हणणं काय ?
मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मांडली. मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरु आहेत. त्या अफवा थांबवाव्यात असेही तुपकर यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार
मला शेतकरी संघटनेच राहूनच काम करायचे आहे. शेतकरी हा माझा आत्मा असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचंय. यासाठी मी आजपासून कामाला लागलो असल्याची तुपकर म्हणाले. गेल्या चार ते पाच वर्षात अनेकवेळा राजू शेट्टी यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली असल्याचे तुपकर म्हणाले. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. संघटनेत राहूनच चळवळीचं काम करत राहणार आहे. ते मला नेतृत्वानं प्रामाणिकपणानं करु द्यावं अशी माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले. शेतकरी प्रश्नांवर लढण्यासाठी महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Ravikant Tupkar : भाजपच्या कोणत्याही नेत्याचा मला फोन नाही, आशिष देशमुखांच्या वक्तव्यानंतर रविकांत तुपकरांचं प्रत्युत्तर
[ad_2]