Apple Supplier Foxconn Begins IPhone 15 Production In India Ahead Launch Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

श्रीपेरंबुदुर, तामिळनाडू : भारतात iPhone 15 चं उत्पादन सुरु झालं आहे. अ‍ॅपलची नेक्स्ट जनरेशन आयफोन 15 (iPhone 15) सीरिज लवकरच बाजारात दाखल होणार आहे. त्याआधी भारतात आयफोन 15 (iPhone 15) चं उत्पादन सुरु करण्यात आलं आहे. अ‍ॅपल कंपनीची पुरवठादार फॉक्सकॉन कंपनीने (Foxconn Technology Group) भारतामध्ये आयफोन 15 तयार करण्यास सुरुवात केली आहे. 

‘मेड इन इंडिया’ आयफोन

अलिकडच्या काळात आयफोनची क्रेझ वाढली आहे. भारतातही लाखो आयफोन युजर्स आहेत. अ‍ॅपल कंपनी (Apple) लवकरच बाजारात iPhone 15 सीरिज लाँच करणार आहे. त्याआधी भारतीयांसाठी एक चांगली बातमी आहे. आता ‘मेड इन चायना’ नाही तर ‘मेड इन इंडिया’ आयफोन (iPhone) वापरता येणार आहेत. 

‘या’ राज्यात आयफोनचं उत्पादन सुरु

तामिळनाडूमध्ये आयफोन 15 च्या प्रोडक्शनला सुरुवात करण्यात आली आहे. अ‍ॅपल कंपनी सप्टेंबर 2023 मध्ये आयफोन 15 (iPhone 15) सिरीज लाँच करणार आहे. ब्लूमबर्गच्या (Bloomberg) रिपोर्टनुसार, फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदुर (Sriperumbudur) येथील प्लांटमध्ये आयफोन 15 च्या उत्पादनाला सुरुवात केली आहे.

फॉक्सकॉन कंपनीशी करार

आयफोन 15 (iPhone 15) चं उत्पादन सुरू झाल्याचं आता समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अ‍ॅपल कंपनी (Apple) ने अ‍ॅपल एअरपॉड्स (Apple Airpods) बनवण्यासाठीही फॉक्सकॉन कंपनीशी करार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फॉक्सकॉनने (Foxconn) हैदराबाद प्लांटसाठी 400 दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. डिसेंबर 2024 पर्यंत येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. तसेच फॉक्सकॉनच्या हैदराबाद कारखान्यात एअरपॉड्स बनवले जातील. डिसेंबरपर्यंत कारखाना मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.

चीन उत्पादन कमी करण्याचा अ‍ॅपलचा प्रयत्न

अ‍ॅपलचं सर्वाधिक उत्पादन हे सध्या चीनमधून केलं जात आहे. पण चीनमधील कोविड लॉकडाऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलती भूमिका तसेच वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील वाढत्या तणावानंतर अ‍ॅपलने चीनमधून मॅन्युफॅक्चरिंग कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अ‍ॅपलकडून म्यॅन्युफॅक्चरिंगसाठी चीन वगळता इतर देशांतील पर्यायांची चाचपणी सुरू आहे. अ‍ॅपलने पूर्वीच्या तुलनेत सध्या चीनमधून उत्पादन कमी केलं असून इतर देशांमध्ये उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचं काम सुरू आहे. भारत हा त्यासाठी एक पर्याय बनला असून भारतात भविष्यात अ‍ॅपलचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जाऊ शकतं. 

कसा असेल आयफोन 15? 

आयफोनच्या या सीरिजमध्ये कंपनी त्यांचे बटनलेस डीझाइन फिचर या सीरिजमध्ये ठेवणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आयफोन त्यांच्या जुन्या म्युट बटनामध्ये देखील बदल करणार आहे. अ‍ॅपलच्या अल्ट्रा वॉचचे कस्टमायजेबल फिचर बटन या सीरिजमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. पण हे फिचर आयफोन प्रोच्या काही मर्यादित मॉडेलमध्येच ठेवण्यात येईल, असंही सांगितलं जातं आहे.

आयफोन 15 चे खास फिचर्स

आयफोन 15 च्या या सीरिजमध्ये डिसप्ले हा पातळ बेजल्समध्ये असल्याने युजर्संना त्याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच युजर्स या सीरिजमध्ये अ‍ॅपलच्या लाइटनिंग पोर्टऐवजी युएसबी टाइप-सी पोर्ट असण्याची अपेक्षा करत आहेत. 

 

[ad_2]

Related posts