Wrestlers Candle March From Jantar Mantar To India Gate Demanding Arrest Of Brijbhushan Singh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wrestlers Candle March: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी मंगळवारी (23 मे) कँडल मार्च काढला. जंतरमंतर ते इंडिया गेटपर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. या मोर्चात खापचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. माजी राज्यपाल सत्यपाल मलिकही कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी इंडिया गेटवर पोहोचले.

कँडल मार्चमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत हेही उपस्थित होते. कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला संताप व्यक्त केला. त्याने म्हटले की, आमच्या बहिणींचा आदर आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आहे. जोपर्यंत देशातील मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. या चळवळीला बदनाम करण्याचे काम अनेक लोक करत असल्याचेही बजरंग पुनियाने सांगितले.

‘चॅम्पियन रस्त्यावर का आहेत?’

भारतावर प्रेम करणाऱ्या सर्व धर्म आणि जातीच्या लोकांनी सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की, आमचे चॅम्पियन एक महिन्यापासून रस्त्यावर का आहेत? त्यांची जागा रस्ता नसून आखाडा आहे, असे कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटले. तर जंतरमंतरवरील लढाई ही देशाच्या मुलींची लढाई आहे, ज्यामध्ये तुम्हा सर्वांना साथ द्यावी लागेल जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल, अशी विनंती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने जनतेकडे केली. न्यायासाठी हजारो लोकांनी जंतरमंतर ते इंडिया गेट असा मोर्चा काढला. आज आमच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला, पण आजपर्यंत आम्हाला न्याय मिळण्याची आशा दिसत नाही, असंही ती म्हणाली.

‘…तर बृजभूषण सिंह तुरुंगात असते’

एबीपी न्यूजशी बोलताना माजी राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, आंदोलनकर्त्यांचे ऐकले जात नाही. सरकार चांगले आणि योग्य असते तर बृजभूषण सिंह तुरुंगात गेले असते. देशातील अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत. सिंह यांच्यावर एका अल्पवयीनसह सहा महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या खासदाराविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले होते.

news reels Reels

गेल्या रविवारी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ हरियाणातील रोहतक येथे खाप महापंचायतही झाली. बृजभूषण शरण सिंह यांना विरोध करणाऱ्या महिला 28 मे रोजी नवीन संसद भवनासमोर पंचायत आयोजित करतील, असं यावेळी ठरवण्यात आलं होतं. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.

हेही वाचा:

UPSC 2022 Results: सेवानिवृत्त एसटी वाहकाचा मुलगा झाला आयएएस; पहिल्यांदा अपयश पण आई वडिलांना दिलेल्या बळाने यशाच्या शिखरावर

[ad_2]

Related posts