Knee Pain Joint Pain Muscle Relief and Swelling In Bones Home Remeies With Homemade Ayurvedic Oil; गुडघेदुखी हाडांच्या वेदना आणि सूज यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय आणि तेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Home Remedies For Knee Pain : गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. आता केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही याचा सामना करावा लागत आहे. आहारात Vitamin D, Calcium आणि Iron यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या वयामुळे स्नायू आणि टिश्यूसचे नुकसान झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. अनेकांना प्रश्न असतो की गुडघेदुखीवर उपचार काय? तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुडघेदुखीला हलक्यात घेऊ नये.

अधूनमधून गुडघेदुखी होणे हे अगदीच सामान्य आहे परंतु जर तुम्हाला सतत आणि तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे. घरगुती उपाय, व्यायाम आणि औषधांनी गुडघेदुखीवर उपचार करता येतात. नोएडाच्या ई-260 सेक्टर 27 मध्ये असणाऱ्या कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर कपिल त्यागी यांनी गुडघेदुखीवर काही साधेसोपे आणि घरगुती उपाय सांगितले आहेत. (फोटो सौजन्य :- iStock)

आले

आले

स्नायूंमधील ताण किंवा सांधेदुखी तसेच गुडघेदुखीसाठी आले उत्तम आहे. आल्यामध्ये अँटीइंफ्लेमेट्री, अँटीअल्सर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यासाठी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचे पाणी पिऊ शकता किंवा आल्याची पेस्ट बनवून वेदना होणा-या जागी लावू शकता.
(वाचा :- ही भाजी देते जीवनदान, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, हार्ट अटॅकचा धोका करते कायमचा नष्ट, कॅन्सरपासूनही वाचवते)​

हळद

हळद

हळदीमध्ये अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म असतात आणि हळद हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी हळदीचा वापर अनेक प्रकारे करता येतो. गरम दुधात हळद मिसळून तुम्ही याचे सेवन करू शकता. शिवाय तुम्ही प्रभावित भागावर हळदीची पेस्ट देखील लावू शकता.

(वाचा :- Fruits for Diabetes : पोटात जाताच डायबिटीज व रक्तातील साखरेला मुळापासून दाबून टाकतात ही 5 फळं, लगेच खायला घ्या)​

गुळवेल, गुडुची किंवा गिलोय

गुळवेल, गुडुची किंवा गिलोय

गुळवेल सांधेदुखीच्या वेदनांवर उपयुक्त ठरू शकते. अनेक डॉक्टर सुद्धा सांधेदुखीच्या, गुडघ्याच्या वेदनेवर गुळवेलचा रस पिण्याचा सल्ला देतात. गुळवेलमध्ये अँटीइंफ्लेमेटरी आणि संधिवाताविरोधी गुणधर्म आहेत जे संधिवात कमी करण्यास मदत करतात. सांधेदुखीसाठी गुळवेल पावडर कोमट दुधासोबत घ्या.
(वाचा :- Uric Acid चे कट्टर दुश्मन हे 5 स्वस्त पदार्थ, लघवीतून बाहेर फेकतात सर्व घाण, कधीच होत नाही मुतखड व हाडं खिळखिळी)​

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल

गुडघेदुखी दूर करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. हे गुडघ्याच्या आसपासच्या नसांमधील रक्त प्रवाह वाढवते, स्नायू आणि सांधेदुखी कमी करते. यासाठी मोहरीच्या तेलात ठेचलेली लसणाची एक पाकळी टाकून गुडघ्यांना मसाज करा.
(वाचा :- Bad Foods For Liver : बापरे, हे 6 पदार्थ लिव्हरवर करतात जखमा, जेवण पचणं व रक्त शुद्धतेची क्रिया होते पूर्ण बंद)​

सैंधव मीठ किंवा रॉक सॉल्ट

सैंधव मीठ किंवा रॉक सॉल्ट

एप्सम सॉल्ट, रॉक सॉल्ट किंवा सैंधव मीठामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात, जसे की मॅग्नेशियम आणि सल्फेट. विशेषतः मॅग्नेशियममुळे प्रभावित भागाची सूज कमी होते. यासाठी आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ मिसळा. या मीठाच्या पाण्यात अंघोळ केल्याने रक्त प्रवाह सुधारतो. याशिवाय तुम्ही तुमच्या पाण्यात पुदीन्याचं तेल आणि लोबान तेल देखील घालू शकता.
(वाचा :- Constipation Fruits : आतड्यांत साचलेली विषारी घाण झटक्यात नष्ट करतात हे 5 उपाय, पोट होतं एका मिनिटात साफ व हलकं)​

लिंबू

लिंबू

गुडघेदुखी दूर करण्यासाठी लिंबाचा रस प्रभावी उपाय म्हणून काम करतो. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड शरीरातील यूरिक ऍसिड कमी करते जे गाउटचे कारण आहे. लिंबूमध्ये अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात जे सूज, वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही लिंबाची साल (सुती कापडात गुंडाळून) गरम तिळाच्या तेलात भिजवून गुडघ्यावर ठेवू शकता.
(वाचा :- Weight Loss Fruits: पोटात जाताच चरबी मेणासारखी जाळून टाकतात ही 8 फळं, जिम व डाएट न करता पोटाची ढेरी होते छुमंतर)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

गुडघेदुखीच्या त्रासावर घरगुती उपाय

Knee Pain : हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास होतोय, घरीच करा ‘हे’ सोपे उपाय

संधिवाताचा त्रास असेल तर करा हे उपाय

Sandhivata Treatment | संधिवाताच्या त्रास असेल तर घरच्या घरी करा ‘या’ गोष्टी | Maharashtra Times

हाडांच्या मजबूतीसाठी खा हे पदार्थ

Bones and Joints Day | Foods to Strengthen Bones and Joints | हाडांना मजबूत कसे करावे?

मणक्याची गादी सरकणं आणि त्यावर उपाय

Slip Disc Pain | सरकलेली मणक्याची चकती आणि त्यावरील सोपे उपाय | Health | Maharashtra Times

[ad_2]

Related posts