CoronaVirus Who Chief Warning About Next Deadly Pandemic Disease X Raise Concern; करोनापेक्षाही भयंकर महामारी येणार, ‘डिजीज X’ चा WHO कडून इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : करोना हे नाव घेतलं तरी सगळ्यांना धडकी भरेल. कारण, या जीवघेण्या महामारीने अनेकांना हिरावून घेतलं. यामुळे किती कुटुंबे उद्ध्वस्त झाली असतील, याचा आपण अंदाजही लावू शकणार नाही. २०१९ मध्ये सुरू झालेली या महामारीची दहशत आता काही प्रमाणात कमी झाली आहे. शास्त्रज्ञांना करोनाची लस तयार करून या महारीचा धोका कमी करण्यास मोठी मदत झाली. पण आता सगळं काही ठीक झालं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

करोनानंतर आणखी एका महामारीचं संकट

करोनाच्या ३ वर्षानंतर परिस्थिती सामान्य वाटत असली तरी पुढच्या येणाऱ्या काळात आणखी एका महामारीचा उद्रेक होणार असल्याचा इशारा शास्रज्ञांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने यासंबंधी महत्त्वाचा अलर्ट दिला असून नागरिकांना यासंबंधी सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. WHO च्या प्रमुखांनी संपूर्ण जगाला पुढील महामारीसाठी तयार राहण्यास सांगितलं आहे.

Monsoon 2023 : मान्सूनसंबंधी मोठे अपडेट्स, हवामान खात्याने दिली सगळ्यांसाठी आनंदाची बातमी

या आजाराने चिंता वाढली….

WHO च्या मते करोनापेक्षाही जास्त प्राणघातक महामारी भविष्यात हल्ला करू शकते. या इशाऱ्यानंतर नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. पण यावर घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घेणं, हा एकच पर्याय आपल्याकडे आहे. दरम्यान, पुढील प्राणघातक महामारीसाठी काय कारणं असू शकतात या घटकांची एक छोटी यादी समोर आली आहे. यामध्ये बहुतेक आजारांबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये इबोला, सार्स आणि झिका या गंभीर आजारांचा समावेश आहे. मात्र, डिसीज एक्स नावाच्या महामारीमुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे.

हिमालय पर्वतामुळे १९० कोटी लोकांचे आयुष्य संकटात; एक-दोन नव्हे भारतासह १६ देशांना अलर्ट
डब्ल्यूएचओ वेबसाइटनुसार, या गंभीर आजाराबद्दल अद्याप फार रिसर्च झालेला नाही. हा आजार व्हायरस, बॅक्टेरिया आणि बुरशी या महत्त्वाच्या कारणांमुळे होऊ शकतो. बाल्टिमोर इथल्या जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाचे संशोधक प्रणव चॅटर्जी यांनी सांगितले की, ‘डिसीज एक्स हा आजार फार दूर नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हा आजारही मानवनिर्मित असू शकतो. यामध्ये याकडे दुर्लक्ष न करता यावर मात करण्यासाठी उपाययोजना शोधून काढल्या पाहिजे. यासाठी WHO कडून आणि अनेक हॉस्पिट्लमधून काम सुरू असल्याची माहिती आहे.

पतीशी घटस्फोट घेऊन २ मुलांच्या आईने केलं मुलीशीच लग्न, समलिंगी विवाहाची रोमँटिक लव्ह स्टोरी

[ad_2]

Related posts