Mohammed Siraj Shared Photo With Rishabh Pant National Cricket Academy Bangalore

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rishabh Pant Siraj Photo:  टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसमध्ये जबरदस्त सुधारणा आहे. तो दररोज सराव करत आहे. नुकतेच फलंदाजी करतानाचा पंतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पंत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. पंत नेटमध्ये फलंदाजी करत आहे. नुकताच त्याच्या फलंदाजाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पंतसोबतचा फोटो वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने पोस्ट केलाय. या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेही हाच फोटो जबरदस्त कॅप्शनसह शेअर केला आहे.

गेल्यावर्षा अखेरीस ऋषभ पंत याचा कार अपघात झाला होता. अपघातामधून पंत थोडक्यात बचावला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूरच आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परतण्यासाठी पंतने खूप मेहनत घेतली. रुग्णालयातून परतल्यानंतर पंत बराच वेळ घरीच होता. त्यानंतर तो बंगळुरूला पोहोचला. येथे त्याने नेटमध्ये घाम गाळला. पंतसोबत मोहम्मद सिराजनेही अकादमीमध्ये वेळ घालवला. सिराजने नुकताच अकादमीतीलच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो पंतसोबत दिसत आहे.




रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनेही हा फोटो ट्विट केला आहे. आरसीबीने दिलेले कॅप्शन सध्या चर्चेचा विषय आहे. आरसीबीने गाबा कसोटीची आठवण काढत ट्वीट केलेय. गाबाचे हे दोन हिरो पुन्हा एकदा एकत्र मैदानात दिसतील. 

भारताने वेस्ट इंडिजविरोधात कसोटी मालिका जिंकली होती. त्यामध्ये सिराजने चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याला वनडे आणि टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. सिराजही आशिया चषकात भारतीय संघात खेळण्याची शक्यता आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारताने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. सिराजला संघात स्थान मिळू शकते. त्याने आतापर्यंत 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये 43 बळी घेतले आहेत. त्याने टी-20 मध्ये भारताकडून 11 विकेट घेतल्या आहेत. सिराजने टेस्ट फॉरमॅटमध्ये 59 विकेट घेतल्या आहेत.

कार अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत
मागील वर्षी 30 डिसेंबर रोजी कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातात त्याला खूप गंभीर दुखापत झाली होती, ज्यावर बराच काळ उपचार करण्यात आले. त्याच्या गुडघ्याचा लिगामेंट खराब झाल्याने त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर ऋषभ पंत बंगळुरु इथल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅब करत आहे.



[ad_2]

Related posts