[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा आणखी एक वाद आता समोर (Hotel Vaishali) आला आहे. हॉटेल वैशालीच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी आता त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन त्यांचा पती मागील दोन महिन्यापासून बेपत्ता असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलीला शोधून द्यावे आणि पतीला अटक करण्यात यावी अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. विश्वजीत जाधव असं त्यांच्या पतीचं नाव आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.
हॉटेल वैशालीची पावर ऑफ अटर्नि बंदुकीचा धाक दाखवून पतीने नावावर करून घेतल्याचा आरोप निकिता शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपासून मी माझ्या मुलीचा चेहरा पाहिला नाही. तिची आणि माझी भेट घडून आणावी अशी विनवणीही निकिता शेट्टी यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
काही दिवसांपुर्वी पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप हॉटेल मालकाच्या निकिता यांनी त्यांच्या पतीवर केला होता. बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप मालकाच्या मुलीने केला होता. तसंच, लग्नाआधी त्यानं बलात्कार केल्याचा आरोपही केला होता. पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात महिलेनं पोलिसांत तक्रार दिली होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विश्वजीत विनायकराव जाधव, अभिजीत विनायकराव जाधव, विनायकराव जाधव आणि वैशाली गायकवाड जाधव यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दारु आणि ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरीक संबंध केल्याचा आरोप
आरोपी पती विश्वजीत याने फिर्यादीला 2018 मध्ये घोले रोड येथील राहत्या घरी नेले आणि दारु, ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. इतक्यावरच न थांबता आरोपीने पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली. फिर्यादीच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या कार परस्पर विकल्या. तसेच, फिर्यादी यांचे एक कोटी 70 लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Vaishali Hotel Pune : बंदुकीच्या धाकावर पुण्यातील हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न, मालकाच्या कन्येचा पतीवर आरोप
[ad_2]