Pune Mhada Houses In Pune City Process Will Start From 25th August

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस (Mhada Pune) वाढत आहे. त्यामुळे पुण्यात घरांचीदेखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील अनेक शहरांमधील नागरिक कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाल्यानं घरांची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. याच नागरिकांसाठी आता सुवर्णसंधी आहे. या सगळ्यांचं  पुणे शहरात घर कमी किमतीत घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून पाच हजार घराची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्रक्रिया कधीपासून सुरु होणार आहे, यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. 

मुंबईनंतर आता पुण्यात पाच हजार घरांची सोडत निघणार आहे. यासाठी 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरु होईल. पुणे म्हाडासाठी विविध गट असणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च असे गट असतील. पुणे शहरासह सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसाठी सोडत निघणार आहे, अशी माहिती पुणे म्हाडा मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

पुणे, कोकण, औरंगाबादमध्येही सोडत

म्हाडाच्या सुमारे 10 हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. यात पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या 600  घरांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळांतील घरांच्या सोडतीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच 25ऑगस्टपासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे.  

दहा कोटीचे घर सात कोटींमध्ये, भाजप आमदाराला म्हाडाची लॉटरी

जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे  यांचे दक्षिण मुंबईत आलिशान घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील साडेसात कोटींचे घर म्हाडाच्या लॉटरीत त्यांनी  साडेसात कोटींचे घर  जिंकले. या घराची अंदाजे किंमत दहा कोटीची आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे यंदाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वात महागडे घर होते. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे. नारायण कुचे यांना मुंबईत घर घ्यायचे होते त्यासाठी त्यांनी या घरासाठी पाच अर्ज दाखल केले होते. या घरासाठी त्यांनी सर्वसाधारण व लोकप्रतिनिधी गटातून अर्ज दाखल केले होते. 

संबंधित बातमी-                                   

Mhada Lottery 2023 :म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत वेटिंगवर तर जालन्यातील आमदार कुचे ठरले यशस्वी विजेते

[ad_2]

Related posts