MS Dhoni Spoke Clearly About IPL Retirement ; चेन्नईतील अखेरचा सामना खेळल्यावर धोनी निवृत्तीबाबत स्पष्टच बोलला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : या आयपीएलमधील हा चेन्नईतील धोनीचा अखेरचा सामना होता. कारण चेन्नईचा संघ आता फायनलमध्ये पोहोचला आहे आणि त्यांचा सामना आता गुजरातमध्ये होणार आहे. चेन्नईतील अखेरचा सामना संपल्यावर धोनीने अखेर आपल्या आयपीएलमधीस निवृत्तीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले.सामना संपल्यावर हर्षा भोगले यांनी धोनीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारला होता. हा सामना जिंकल्यावर हर्षा भोगले यांनी धोनीला या सामन्याबाबत आणि फायनलबाबत काही प्रश्न विचारले. आता १०व्यांदा फायनल खेळणार आहेस, तुझ्यासाठी हा फक्त एक सामना आहे का, असे भोगले यांनी प्रथम धोनीला विचारले. त्यानंतर भोगले यांनी धोनीला निवृत्तीबाबत छेडले आणि तु पुन्हा या मैदानात खेळताना दिसणार आहे की नाही, असा त्यांचा प्रश्न होता. पण भोगले यांना धोनीच्या निवृत्तीबाबतच विचारायचे होते. धोनीनेही त्यांना सुरुवातीला, तुम्ही मला नेहमीच हा प्रश्न विचारता, असे म्हण प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. पण भोगले हे आपल्या प्रश्नावर ठाम राहीले आणि त्यानंतर धोनीने निवृत्तीबाबत आपले स्पष्टपणे मत व्यक्त केले. धोनी यावेळी म्हणाला की, ” माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी ८-९ महिन्यांचा अजूनही कालावधी आहे. त्यामुळे माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. आयपीएलचा छोटेखानी लिलाव डिसेंबरमध्ये आहे, त्यावेळी याबाबत निर्णय घेतला जाईल. पण काहीही झाले तरी मी नेहमी CSK च्या संघात असेन. पण संघातून खेळेन की त्यांच्यासाठी मदत करेन, हे सांगता येणार नाही. मी जानेवारीपासून घराबाहेर आहे, मार्चपासून सराव करतोय, त्यामुळे सध्याच्या घडीला घरी जाण्याची ओढ जास्त लागली आहे. चेन्नईच्या संघातून खेळणार की नाही, हे ठरवण्यासाठी अजून बराचच वेळ आहे. सध्या तरी गुजरातमध्ये जाऊन फायनल खेळणे हे आमच्यासाठी महत्वाचे असेल. फायनल झाली की काही महिन्यांनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी हे सांगणे मला उचित वाटत नाही.”

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं


धोनी निवृत्ती कधी घेणार, याची चर्चा गेल्या २-३ वर्षांपासून सुरु आहे. पण धोनी अजूनही चेन्नईकडून खेळत आहे आणि सध्या तरी त्याच्या मनात निवृत्तीचा विचार नसेल.

[ad_2]

Related posts