Indian Army Jawan Killed 3 Missing After Avalanche Hits Mount Kun In Ladakh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लडाख :  लडाखमधील  माउंट कूनजवळ (Mount Kun In Ladakh) भारतीय लष्कराच्या एका तुकडीला हिमस्खलनाच्या (Avalanche) संकटाला सामोरे जावे लागले आहे. सैन्य दलाच्या (Indian Army) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिमस्खलनात एका जवानाला प्राण गमवावे लागले आहे. तर, अन्य काही बेपत्ता असलेल्या जवानांचा शोध सुरू आहे. सोमवारी, 9 ऑक्टोबर रोजी ही दुर्देवी घटना घडली. सूत्रांच्या माहितीनुसार तीन जवान हिमस्खलनात अडकले आहेत. 

गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते जवान

सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले की हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (एचएडब्ल्यूएस) आणि लष्कराच्या आर्मी अॅडव्हेंचर विंगमधील सुमारे 40 जवानांची एक तुकडी लडाखमधील माउंट कुन जवळ नियमित प्रशिक्षणासाठी गेली होती.

“ट्रेन द ट्रेनर’ संकल्पनेअंतर्गत HAWS सहभागींना योग्य गिर्यारोहण प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे सराव या हंगामात सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, 8 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण चढाईदरम्यान लष्कराच्या तुकडीला मोठ्या हिमस्खलनाला सामोरे जावे लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शोध मोहीम अजूनही सुरू 

सूत्रांनी सांगितले की, भारतीय सैन्य दलातील चार जवान हिमस्खलनात अडकले. या घटनेची माहिती होताच, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. या धोकादायक शोध मोहिमेदरम्यान हिमस्खलनात अडकलेल्या एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर, अन्य तीन जवानांसाठीची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “खराब हवामान आणि प्रचंड बर्फवृष्टी असूनही, प्रचंड बर्फाखाली अडकलेल्या इतर लोकांना शोधण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :



[ad_2]

Related posts