( प्रगत भारत । pragatbharat.com)
Dying Wife Last Wish: मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करावी असं म्हटलं जातं. मात्र या अशा शेवटच्या इच्छेमुळे इच्छा विचारणारी व्यक्तीच अडचणीत आली तर? असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीबरोबर घडला जेव्हा त्याच्या मरणासन्न अवस्थेतील पत्नीने शेवटची इच्छा म्हणून भलतीच मागणी केली. यासंदर्भात या व्यक्तीनेच रेडिट या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली आहे. तिने केलेल्या मागणीशी आपण सहमत नसून आपल्याला याबद्दल बोलायलाही आवडत नाही असंही या व्यक्तीने म्हटलं आहे.
संसारात पडला मिठाचा खडा
आपली पत्नी फार आजारी असून ती जास्तीत जास्त 9 महिनेच जगू शकते असं या व्यक्तीने म्हटलं आहे. मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र असून त्यांचं लग्नही झालं आहे. आपल्या पत्नीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा आणि तिला शेवटचे काही महिने आनंदात जगता यावं म्हणून पती सर्व प्रयत्न करत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये ही महिला कायमची बेडला खिळून राहील असं सांगण्यात आल्याने या दोघांमध्ये एक गंभीर चर्चा मध्यंतरी झाली. या चर्चेदरम्यान या महिलेने अशी काही शेवटची इच्छा बोलू दाखवली की दोघांच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडला.
‘तिने मला सेक्सबद्दल बरंच काय काय सांगितलं’
या महिलेने तिच्या पूर्वीच्या प्रियकराबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा पतीला बोलून दाखवली. “तिला असं वाटतंय की तिच्या आधीच्या प्रियकराबरोबरच ती शरीरसंबंध ठेवण्यासाठी फार कम्फर्टेबल आणि सामधानी आहे. तिने या चर्चेदरम्यान मला सेक्स अनेकदा केवळ फिजीकल कसा असतो आणि माझ्याबरोबर ठेवलेले शरीरसंबंध भावनिक दृष्यट्या कसे होते याबद्दल ती बोलली,” असं या व्यक्तीने रेडिटवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. पत्नीने केलेली ही मागणी ऐकून या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.
मी हो म्हणायचा विचार करतोय कारण…
पत्नीने केलेली मागणी ऐकून तिची मागणी स्वीकारावी की नाकारावी हेच या व्यक्तीला कळत नसल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपला सन्मान जपून पत्नीला नकार द्यावा की तिला तिच्या आधीच्या प्रियकराकडे जाऊ द्यावं याबद्दल संभ्रमावस्थेत असल्याचं या व्यक्तीने म्हटलं आहे. मात्र फार विचार केल्यानंतर आपण तिला हो म्हणण्याचं ठरवलं असल्याचंही त्याने नमूद केलं आहे. ही पत्नीची मरणापूर्वीची शेवटची इच्छा असल्याने आपण होकार देण्याच्या विचारात असल्याचं या व्यक्तीने म्हटलं आहे. “तिने मला अशा कोडींत पकडलं आहे की मला होय म्हणावं लागेल, कारण ती मृत्यूच्या दारात उभी आहे,” असाही उल्लेख त्याने पोस्टमध्ये केला आहे. मात्र पत्नीने केलेल्या या मागणीमुळे आपण फार दुखवलो आहे असंही त्याने म्हटलं आहे. “पूर्वीच्या प्रियकराबरोबर तिने केलेला सेक्स हा इतका उत्तम आहे की तिला मरणापूर्वी पुन्हा त्याचा अनुभव घ्यायचा आहे, हा विचार करुन मी फार दुखी झालो आहे. मला यासंदर्भातील सर्वच गोष्टींची आता चीड येत आहे,” असं या व्यक्तीने म्हटलं आहे.
लोकांनी नोंदवल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पती म्हणून या महिलेला घटस्फोट देऊन जे करायचे आहे ते करु द्यावे असं म्हटलं आहे. काहींनी दोघांचं नातं इथपर्यंत आलं याचा अर्थ त्यामध्ये एकमेकांबद्दलचा आदर, प्रेम आणि आपुलकी कमी असल्याचं दिसत आहे, असं निरिक्षण नोंदवलं आहे.