IND Vs IRE 2nd T20 Live Updates India playing against Ireland match highlights Malahide Cricket Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND Vs IRE 2nd T20 Live Updates : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज दुसरा टी20 सामना होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी विजय मिळवला होता. आज दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरले. तर दुसरीकडे आयर्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भेदक मारा केला होता. त्याला रवि बिश्नोई याच्या फिरकीची जोड मिळाली होती. आजच्याही सामन्यात यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची आपेक्षा असेल. अर्शदीप सिंह पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता, आज त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी क्रीडा चाहत्यांना आपेक्षा आहे. 

दुसरीकडे आयर्लंडला आपल्या फलंदाजीवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडची आघाडीची फळी ढेपाळली होती. अवघ्या 31 धावांत आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. लोअर ऑर्डरच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडचा संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचला होता. आज आघाडीच्या फळीकडून मोठ्या खेळीची आपेक्षा असेल. 

भारतीय फलंदाजांना पहिल्या सामन्यात तितका वाव मिळाला नव्हता. सहा षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली होती. यशस्वी जायस्वाल याने दमदार सुरुवात केली होती. ऋतुराजने त्याला चांगली साथ दिली होती. तिलक वर्मा मात्र गोल्डन डकचा शिकार झाला होता. आज होणाऱ्या सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंकडून मोठ्या खेळीची आपेक्षा असेल. 

कुठे पाहणार लाईव्ह ? 

भारत आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या तीन टी20 सामन्याची मालिका भारतात सपोर्ट्स 18 येथे लाईव्ह पाहता येतील. तर जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाईटकवरही सामन्यांचा आनंद घेता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही सामन्यांसंदर्भात अपडेट मिळेल.  

कधी सुरु होणार सामना ?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 सामने रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहेत. सात वाजता नाणेफेक होईल. 

आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक –

भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.  तिन्ही सामने डबलिन येथेच होणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. या सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला होता. आज डबलिन येथे दुसरा टी20 सामना होणार आहे.  23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना डबलिन येथेच होणार आहे. 

दोन्ही संघाचे शिलेदार कोण कोण ?

भारत : 

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड : 

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, रॉस एडेयर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँफर, जॉर्ज डॉकरेल, फियोन हँड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क एडेयर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, थियो वॅन वोर्कॉम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग.

[ad_2]

Related posts