LSG Vs MI IPL 2023 Eliminator Playing 11 Chepauk Pitch Report Mumbai Indians Vs Lucknow Super Giants 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023 Eliminator LSG vs MI Playing 11 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) स्थान मिळवलं. आज हे दोन्ही संघ (MI vs LSG) आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात आमने-सामने उभे ठाकणार आहेत. आयपीएल 2023 चा एलिमिनेटर सामना (IPL 2023 Eliminator) 24 मे रोजी, बुधवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर रंगणार आहे.

MI vs LSG, IPL 2023 Eliminator : मुंबई विरुद्ध लखनौ

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम (MA Chidambaram Stadium) म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) आज कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya) नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. लखनौ संघाने लीग 14 साखळी सामन्यांपैकी आठ सामने जिंकून आयपीएल 2023 गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं. लखनौनं यंदाच्या मोसमात पाच सामने गमावले असून संघाकडे 17 गुण आहेत. 

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium Pitch Report) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

LSG vs MI Probable Playing XI : दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11

Lucknow Super Giants  : लखनौ सुपर जायंट्स

क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), काइल मेअर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉनिस, निकोलस पुरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.

Mumbai Indians : मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, आकाश माधवाल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts