( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gaj Kesari Yoga: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक शुभ किंवा अशुभ योग तयार होत असतात. यापैकी एक योग म्हणजे गजकेसरी योग. गजकेसरी योग हा शुभ योगांपैकी एक मानला जातो. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो तेव्हा त्याला धन-धान्य, पद-प्रतिष्ठा वाढीबरोबरच प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
सध्याच्या परिस्थितीत बृहस्पति मेष राशीत बसला आहे. यासोबतच चंद्राने 21 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता तूळ राशीत प्रवेश केलाय. अशा स्थितीत गुरू आणि चंद्र यांचा संयोग झाला आहे. यामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे. दरम्यान गजकेसरी योगामुळे काहींना विशेष लाभ मिळू शकतो. पण यावेळी गुरु बृहस्पतीची राहूशी युती आहे. अशा स्थितीत अशा काही राशीच्या लोकांना थोडं सावध राहणं गरजेचं आहे.
गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे या राशींच्या व्यक्तींना राहवं लागणार सावध
मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींसाठी गजकेसरी योग लाभदायक ठरणार नाही. कारण राहूच्या राशीमुळे या राशीच्या लोकांना धनहानीसह मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनातही काही उलथापालथ होऊ शकते. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सिंह रास
सिंह राशीमध्ये सूर्य ग्रह आहे. याशिवाय चौथ्या घरात राहुमुळे गजकेसरी योग या राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार नाही. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा लागणार आहे. वैवाहिक जीवनातही काही समस्या येऊ शकतात. तुम्ही एखाद्या कायदेशीर कचाट्यातही अडकू शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला भरपूर तोटा सहन करावा लागू शकतो.
मकर रास
या राशीमध्ये राहू आणि गुरूचा संयोग चौथ्या भावात झाला आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या निर्णयक्षमतेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांच्या जीवनात काही समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कोणत्याही कौटुंबिक प्रकरणामुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो. करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबामध्ये जुने वाद पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )